मानोरी परिसरातील नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 04:04 PM2020-03-22T16:04:48+5:302020-03-22T16:05:46+5:30

मानोरी : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी रविवारी शासनस्तरावरून पाळण्यात आलेल्या बंदला मानोरी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दवाखाने, मेडिकल, किराणा दुकाने ही अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिकांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवहार बंद ठेवत सहभाग नोंदवला.

 The response of the people of Manori area to the bandh | मानोरी परिसरातील नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मानोरी परिसरातील नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

सध्या शेतमजुरीची आणि मशागतीची कामे जोरात सुरू असली तरी कोरोनावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी तसेच मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील नागरिकांनी देखील घरातून बाहेर न निघता एक दिवस काम बंद ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान नाशिक -औरंगाबाद महामार्गासह मानोरी परिसरातील वाहतूक, रहदारीसुद्धा नेहमीपेक्षा अत्यल्प प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे महामार्ग तसेच गाव अंतर्गत रस्ते, गावच्या वेशी सकाळपासूनच नागरिकांअभावी ओस पडल्याचे दिसून आले. शहरी भागात कोरोना सदृश्य रु ग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असताना ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राने खेडोपाडी , गावोगावी एका आरोग्य सेवकाची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जरी कोरोनाचे रु ग्ण आढळले नसले तरी वेळीच प्रशासनाने काळजी घेऊन आरोग्य सेवक नेमावा अशी मागणी केली जात आहे. तसेच खेड्या-पाड्यात कोरोनाची भीती नाही अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत असून अनेक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरिकांचा घोळका दिसून येत आहे. त्यामुळे पोलीसांनी ग्रामीण भागात गस्त घालण्याची मागणी होऊ लागली आहे.
 

Web Title:  The response of the people of Manori area to the bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.