पेठ तालुक्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:15 AM2021-04-21T04:15:08+5:302021-04-21T04:15:08+5:30
------------------------------------------------------ पेठ : शहरासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे एकत्रित भजन, कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम ...
------------------------------------------------------
पेठ : शहरासह तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे एकत्रित भजन, कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करू नयेत, असे आवाहन वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प. पंढरीनाथ वालवणे यांनी केले आहे.
न दिसणाऱ्या विषाणूला आपण आमंत्रित करणे व समाजाला या महाकाय राक्षसाच्या स्वाधीन करणे हे बुद्धिवादी कीर्तनकारांनी टाळावे, असेही वालवणे यांनी म्हटले आहे.
---------------------------------------
कलापथकाद्वारे जनजागृती
पेठ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, नागरिकांची भीती दूर व्हावी, लसीकरण करून घ्यावे, लक्षणे दिसताच चाचणी करून घ्यावी, यासाठी गावात जनजागृती करण्यात आली.
सरपंच हिरा जांजर यांच्या उपस्थितीत कलापथकप्रमुख चंद्रकांत गायकवाड यांच्या माध्यमातून गावातील मुख्य चौकात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपसरपंच विष्णू वाघमारे, ग्रामसेवक सचिन नेहेते, सदस्य
गोपाळ गायकवाड, लहू गायकवाड, दत्तात्रय गायकवाड,
पोलीस पाटील योगेश गायकवाड उपस्थित होते.