राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

By Admin | Published: February 20, 2016 11:15 PM2016-02-20T23:15:09+5:302016-02-20T23:16:39+5:30

विधी महाविद्यालय : पारितोषिक वितरण

Response to state-level questions competition | राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद

googlenewsNext

नाशिक : मविप्र विधी महाविद्यालय आणि सामाजिक न्याय प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय विधी प्रश्नमंजूषा स्पर्धेत पारितोषिकांची लयलूट करण्यात आली. सी.एम.सी.एस. महाविद्यालयात ही स्पर्धा झाली.
विद्यार्थ्यांना कायद्याची समग्र माहिती व्हावी व ज्युनिअर वकील यांचा सराव व्हावा या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत २५ गटांनी सहभाग नोंदविला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन झाले.
याप्रसंगी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. राजेंद्र घुमरे आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वकिलीपेशात यशस्वी होण्यासाठी घ्यावयाच्या परिश्रमाची व अभ्यास पद्धतीची माहिती दिली. अ‍ॅड. अभिजीत दीक्षित, अ‍ॅड. गौरव दिवाकर, अ‍ॅड. राहुल कुलकर्णी यांच्या ज्युनिअर वकील संघाला प्रथम पारितोषिक मिळाले. नवजीवन विधी महाविद्यालयाच्या संघाला द्वितीय, तर मविप्र विधी महाविद्यालयाला तृतीय पारितोषिक मिळाले.
एनबीटी विधी महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संध्या गडाख, अ‍ॅड. विजया माहेश्वरी, अ‍ॅड. रेवती कोतवाल, अभिजीत साबळे, प्रा. चारुशीला खैरनार, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा न्यायालयातील ज्युनिअर वकील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Response to state-level questions competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.