येवल्यात दोन दिवसीय लसीकरण शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:13+5:302021-09-17T04:19:13+5:30
येवला : शहरातील सहस्रार्जुन मंगल कार्यालयात दोन दिवसीय कोविड-१९ लसीकरण शिबिर संपन्न झाले, त्याला ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिराप्रसंगी ...
येवला : शहरातील सहस्रार्जुन मंगल कार्यालयात दोन दिवसीय कोविड-१९ लसीकरण शिबिर संपन्न झाले, त्याला ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
शिबिराप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोमवंशी सहस्रार्जुन क्षत्रिय समाज अध्यक्ष गोविंदसा वाडेकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, गणेश शिंदे, भाजप शहर प्रभारी मनोज दिवटे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजू परदेशी, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने झालेल्या या लसीकरण शिबिरात सेल्फी पॉइंट उपलब्ध करून दिला होता. कार्यक्रमास राधेश्याम परदेशी, सुनील काटवे, राजू वाडेकर, विशाल शिकरे, कुंदन हजारे, राजेंद्र नागपुरे, बाळू साताळकर, हेमंत सांबर, वैष्णव पवार, ललित वाखारे, आदर्श बाकळे, रोहन कुक्कर, पंकज पहिलवान, हेमचंद्र समदडिया, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.
(१६ येवला लस)
160921\16nsk_28_16092021_13.jpg
लसीकरण शिबीरासाला प्रतिसाद .