भगुर्डी येथे लसीकरणास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:09 AM2021-06-13T00:09:15+5:302021-06-13T00:11:58+5:30

अभोणा : आदिवासी ग्रामिण भागात कोवीड लसीकरणाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज व अफवा पसरल्याने नागरीक लस घेण्यास टाळा टाळ करीत आहेत. त्यामुळे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्यासह शासन, आरोग्य विभाग तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आदिवासी भागात याबाबत जनजागृती करीत आहेत.

Response to vaccination at Bhagurdi | भगुर्डी येथे लसीकरणास प्रतिसाद

भगुर्डी येथे लसीकरणास प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्दे ग्रामपंचायत व नांदूरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम घेण्यात आली.

अभोणा : आदिवासी ग्रामिण भागात कोवीड लसीकरणाबाबत अनेक प्रकारचे गैरसमज व अफवा पसरल्याने नागरीक लस घेण्यास टाळा टाळ करीत आहेत. त्यामुळे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्यासह शासन, आरोग्य विभाग तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आदिवासी भागात याबाबत जनजागृती करीत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भगुर्डी (ता. कळवण) येथे ग्रामपंचायत व नांदूरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम घेण्यात आली. यावेळी ४० नागरिकांनी लस घेतली. लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकिय अधिकारी डॉ. सिध्दू, डॉ. विश्वनाथ राठोड, आरोग्यसेविका के. एस. आहेर, गटप्रवर्तक चंद्रकला पवार, आशासेविका फुला माळी आदींनी परिश्रम घेतले.

याप्रसंगी आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड, सरपंच दत्तू गवळी, उपसरपंच आशा देवरे, राजू पाटील, भगवान देवरे, ग्रामसेवक जी. एस. बहिरम, पोलीस पाटील भगवान बागुल यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Response to vaccination at Bhagurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.