देवगाव आरोग्य केंद्रात लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:09 PM2021-04-29T23:09:04+5:302021-04-30T00:58:52+5:30
देवगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २६७९ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
देवगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २६७९ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
दि. १० मार्चपासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या आरोग्य केंद्राला पंधरा गावे जोडलेली आहेत. लसीकरण करण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक तसेच पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १० मार्चपासून आजपर्यंत जवळपास २६७९ लसीकरण करण्यात आले आहे. असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा लहाने यांनी सांगितले. कोविशिल्ड लसीबाबत कोणताही गैरसमज करू नये, असे आवाहन डॉ. लहाने यांनी केले आहे. परिसरात कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी, कर्मचारी व खासगी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायतीने गावात स्वयंस्फूर्तीने सात दिवसाचा जनता कर्फ्यू पाळला. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच वैशाली अंढागळे, उपसरपंच लहानू मेमाने, पोलीसपाटील सुनील बोचरे यांनी केले आहे. लसीकरणास डॉ. रूपेश पगारे, आरोग्यसेविका एस. एम. शेरमाळे, आर. एस. कोल्हे, आरोग्य सहाय्यक लता वाघ, एस.एस. सोनवणे, चंद्रकात यादव, समीर मुरडेश्वर, सुनील निरभवने, आकाश रोकडे, जी.एस. उगले, वाहनचालक व्ही.डी. तुपे, एस.एस. बोचरे, के.व्ही. जाधव, परिचर शीतल उराडे यांचे सहकार्य लाभत आहे.