अभोणातील उपकेंद्रात लसिकरणास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 08:13 PM2021-04-27T20:13:33+5:302021-04-27T20:20:01+5:30
अभोणा : शहर परिसरातील नागरिकांची मागणी व होणारी गैरसोय लक्षात घेता येथील उपआरोग्य केंद्रात मंगळवारी (दि.२७) लसिकरण मोहिम राबविण्यात आली. गावातच लसिकरणासह, अँटिजेन चाचणीची सोय झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त व्यक्त केले आहे.

नांदुरी आरोग्य केंद्रातर्गत लसिकरणासाठी अनेक गावे येत असल्यामुळे तेथे गर्दी होत असते.शिवाय नागरिकांना दहा किलो मिटर अंतर जाऊन तासन्तास थांबावे लागायचे. ही अडचण दुर करण्यासाठी अभोणा ग्रामपालिका पदाधिकाऱ्यांसह शहरातील कार्यकर्ते चेतन बिरारी, भारत हिरे, मनोज वेढणे, राजू पवार, राहूल बिरारी, उमेश दुसाने, अनिल घोडेस्वार यांनी आमदार नितीन पवार यांचेकडे मागणी करत सामुदायिक निवेदन सादर केले होते. त्यानुसार हे केंद्र सुरु करण्यात आले. गावातच लसिकरणाची सोय झाल्याने जेष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंगळवारी (दि.२७ ) सुमारे १५० नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घेतला.