शाळांवर सुरक्षितता ठेवण्याची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:21 AM2019-06-30T00:21:49+5:302019-06-30T00:23:03+5:30
सध्याच्या काळात काम करणाऱ्यांपेक्षा झालेल्या कामांचे चिकित्सात्मक मूल्यमापन करणारेच अधिक झाले असून, समाज, सरकार आणि सहकार अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पहायला मिळते. ही खेदजनक बाब असून, समाजात घडणाºया चांगल्या कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वैचारिकता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळांची
नाशिक : सध्याच्या काळात काम करणाऱ्यांपेक्षा झालेल्या कामांचे चिकित्सात्मक मूल्यमापन करणारेच अधिक झाले असून, समाज, सरकार आणि सहकार अशा सर्वच ठिकाणी ही परिस्थिती पहायला मिळते. ही खेदजनक बाब असून, समाजात घडणाºया चांगल्या कामांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची वैचारिकता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळांची असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. सागर देशपांडे यांनी केले. मात्र सध्या काम करणाºया माणसांपेक्षा काम करू न देणाºया माणसांची संख्याच अधिक झाल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्टÑ समाज सेवा संघ, नाशिक संचलित रचना विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता व स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात ‘शिक्षण-गुरुक्षेत्र की कुरुक्षेत्र’ विषयावर ते बोलत होते. यावेळी डॉ. सागर देशपांडे म्हणाले की, सद्याच्या काळात शैक्षणिक संस्थांची तसेच शाळांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी, कोषाध्यक्ष निरंजन ओक, मिलिंद चिंधडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्याध्यापक संगीता टाकळकर यांनी शाळेत वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. दरम्यान, संस्थेच्या वाघेरे आश्रमशाळेचा एव्हरेस्ट सर करणारा विद्यार्थी मनोहर हिलिंग याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रज्ञा कुलकर्णी केले. तर आभार शीतल पवार यांनी मानले.
डॉ. सागर देशपांडे म्हणाले, शाळांमध्ये सैनिकी शिक्षण मिळणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये हे शिक्षण सक्तीचे करण्यात आले असून, काळाची पावले ओळखून रचना विद्यालयानेही या दिशेने टाकलेले पाऊल उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.