तिघांच्या मृत्यूस जबाबदार चालकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:21 AM2018-12-20T01:21:46+5:302018-12-20T01:22:14+5:30

बेदरकारपणे स्कोडा कार चालवून स्विफ्ट कारला धडक देत तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी शेख फैज फारूख (रा. आयेशानगर) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.के.आर. टंडन यांनी बुधवारी (दि़१९) दोन वर्षे सक्तमजुरी व २३ हजार १०० रुपये दंड तर दुसरा आरोपी फारूख हबीब शेख (रा. आयेशानगर, साहील गार्डन, नाशिक) यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़

 Responsible for the death of three | तिघांच्या मृत्यूस जबाबदार चालकास सक्तमजुरी

तिघांच्या मृत्यूस जबाबदार चालकास सक्तमजुरी

Next

नाशिक : बेदरकारपणे स्कोडा कार चालवून स्विफ्ट कारला धडक देत तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी शेख फैज फारूख (रा. आयेशानगर) यास जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.के.आर. टंडन यांनी बुधवारी (दि़१९) दोन वर्षे सक्तमजुरी व २३ हजार १०० रुपये दंड तर दुसरा आरोपी फारूख हबीब शेख (रा. आयेशानगर, साहील गार्डन, नाशिक) यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली़ मुंबई-आग्रा महामार्गावरील गडकरी चौकात हा अपघात घडला होता़
सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे २६ मे २०१७ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास स्विप्ट कारने (एमएच १५, डीसी ०५२७) भामरे कुटुंबीय जात होते़ गडकरी चौकातून मुंबई नाका सिग्नलकडे वळण घेत असतानाच, त्र्यंबक नाका सिग्नलकडून भरधाव आलेल्या स्कोडा (एमएच ०१, एएल ७९३१) गाडीने भामरे यांच्या स्विप्ट कारला धडक दिली. या भीषण अपघातात स्विप्ट कारमधील योगिनी लीलाधर भामरे (१९), सरिता लीलाधर भामरे (३५, रा. मूळ- जळगाव) व रेखा प्रकाश पाटील (३३, रा. मुंबई) या तिघींचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश टंडन यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सहायक पोलीस निरीक्षक एऩ जे़ कंडारे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते़ यामध्ये सरकारी वकील चंद्रलेखा पगारे यांनी, आरोपींनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव कार चालविल्याचे साक्षीदार व पुराव्यासह सिद्ध केले़ त्यानुसार आरोपी शेख फैज फारूख यास सक्तमजुरी तर फारूख हबीब शेख यास तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली़

Web Title:  Responsible for the death of three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.