विश्रांती : कामावरून घरी जाऊ न शकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था कोरोनायोद्ध्यांना हक्काचा निवारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 01:06 AM2020-07-23T01:06:57+5:302020-07-23T01:07:10+5:30
नाशिक : नाशिक महानगरातील शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स, कर्मचारी, घरे लहान असलेले कर्मचारी तसेच अन्यत्र निवास असलेले कोरोनायोद्धा यांना त्यांच्या कामाच्या आवर्तनानंतर घराऐवजी अन्य हक्काचा निवारा असावा, यासाठी जिल्हा रुग्णालयाने त्यांच्याच आवारात तर नाशिक महापालिकेने माहेश्वरी विद्यार्थी भवनच्या होस्टेलमध्ये त्यांची सुव्यस्थित सोय करून त्यांना कोणतीही समस्या येऊ नये, अशी तजवीज केली आहे.

सर्व वैद्यकीय, शासकीय कर्मचाºयांना सध्या सात दिवसांच्या रोटेशननुसार कामावर यावे लागते. कामावर दाखल झाल्यानंतर सात दिवस काम करून मोठे घर असणारे, स्वतंत्र टॉयलेट,रूमची व्यवस्था असलेले वैद्यकीय कर्मचारी आपापल्या घरी परततात. ज्यांना होम आयसोलेशन शक्य आहे, ते घरी जातात. मात्र, ज्या कर्मचाºयांकडे ही सोय नसेल किंवा काही कुटुंबात घरी कुणी बालक, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आहेत, अशा कर्मचाºयांकडून घरी जाण्याऐवजी या हक्काच्या निवाºयांचा उपयोग केला जातो. त्यात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाºयांसाठी प्रारंभापासूनच जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच एका बाजूला असलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रात सुमारे ४० जणांच्या स्टाफची निवासाची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील अन्य केंद्रांवरून येणाºया आणि नाशकात निवासव्यवस्था नसलेल्या डॉक्टर, नर्स किंवा अन्य सुमारे ३५ कर्मचाºयांची जिल्हा प्रशिक्षण केंद्रात सोय करण्यात आली असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले. दरम्यान मनपाच्या वतीने आयसोलेशनची व्यवस्था नसलेल्या डॉक्टर, नर्स, कर्मचाºयांची प्रारंभी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येत होती. मात्र, काही काळानंतर सर्व कर्मचाºयांसाठी माहेश्वरी विद्यार्थी भवनमध्ये सोय करण्यात आली असल्याचे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने केलेल्या विनंतीनुसार ३०हून अधिक डॉक्टर, कर्मचाºयांची परिपूर्ण व्यवस्था माहेश्वरी विद्यार्थी भवनात पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. कोरोनाच्या लढाईत योगदान तसेच सामाजिक कर्तव्याच्या भावनेने कोरोनायोद्ध्यांसाठी निवासासह अत्यंत चांगल्या दर्जाचे भोजन, नास्ता अशी सोय करून देण्यात आली आहे. माहेश्वरी भवनाच्या सर्व संचालक मंडळाकडून नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देण्यात पुढाकार घेतला जातो. - अनिल बूब, अध्यक्ष, माहेश्वरी विद्यार्थी भवन