वादळ ओसरताच पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:48 AM2020-06-05T00:48:43+5:302020-06-05T00:50:22+5:30
निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाखाली बुधवारी नाशिकसह परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळनंतर पूर्णवेळ विश्रांती घेतली, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. दुसरीकडे वादळी वारा व पावसामुळे झालेल्या पडझडीची आवरासारव, जागोजागी उन्मळून पडलेले झाडे व फांद्या हटविण्याचे काम अग्निशामक दलाने दिवसभर सुरूच होते. वाकलेले खांब व तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण करून शहरातील विद्युत पुरवठा महावितरण विभागाने सुरू केला.
नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाखाली बुधवारी नाशिकसह परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळनंतर पूर्णवेळ विश्रांती घेतली, त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. दुसरीकडे वादळी वारा व पावसामुळे झालेल्या पडझडीची आवरासारव, जागोजागी उन्मळून पडलेले झाडे व फांद्या हटविण्याचे काम अग्निशामक दलाने दिवसभर सुरूच होते. वाकलेले खांब व तुटलेल्या वीज वाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण करून शहरातील विद्युत पुरवठा महावितरण विभागाने सुरू केला.
निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज काहीसा फोल ठरला असून, बुधवारी मध्यरात्री निसर्ग चक्रीवादळ खान्देशातून मध्य प्रदेशाकडे सरकल्याने वादळी वारा व पावसाने काहीशी विश्रांती घेतली. तत्पूर्वी मात्र सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. शहर व परिसरात ठिकठिकाणी सुमारे दोनशेहून अधिक झाडे उन्मळून पडली तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. वादळी वाºयामुळे काही झाडे धोकादायक झाले. झाडे पडल्याने काही घरांचे पत्रे, भिंतींचे नुकसान झाले तर काही ठिकाणी वाहने दबली गेली. विजेचे खांब वाकणे, तारा तुटण्याच्या प्रकारामुळेही महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागले. नाशिक शहरात एका दिवसात १४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे चोहोंबाजूकडे पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी चेंबर तुंबल्याच्या तर घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. मध्यरात्रीनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी सकाळी पुन्हा काही वेळ मध्यम स्वरूपात हजेरी लावली, मात्र त्यानंतर दिवसभर विश्रांती घेतली त्यामुळे जनजीवन पूर्वत होण्यास मदत झाली.