सुरगाणा येथे महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 04:06 PM2020-02-16T16:06:35+5:302020-02-16T16:07:05+5:30

सुरगाणा : येथील संस्थान काळातील महादेव मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून मंदिरात भव्य शिविलंग तसेच, पार्वती, गणपती, खंडेराव व नंदी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व शिखर कलश प्रतिस्थापना उत्सवात करण्यात आली.

Restoration of Mahadev Temple at Surgana | सुरगाणा येथे महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

सुरगाणा येथे जीर्णोद्धार करण्यात आलेल्या महादेव मंदिरात शिविलंग, पार्वती, गणपती, खंडेराव, नंदी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी यज्ञविधी सोहळ्यात सहभागी झालेले शिवभक्त. 

googlenewsNext
ठळक मुद्दे संस्थान काळातील कौलारू असलेल्या महादेव मंदिराचा जिर्णोद्धार आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन दिवस यज्ञविधी सोहळा सुरू होता. हा सोहळा वैभव गुरु जी कोपरगावकर, सुरगाणा येथील पद्माकर खोत, बंडोपंत जोशी, योगेश राव, अविनाश जोशी, राहूल जोशी, अनिल खोत

या तीन दिवस सुरू राहिलेल्या सोहळ्या दरम्यान ह.भ.प. कदम महाराज नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व राजरागिनी वासंती दीदी नाशिक यांनी महाशिवरात्री यावर उपस्थित भाविकांसमोर प्रबोधन केले. स्वामी समर्थ प्रवर्तक नितिन महाले व राम थोरात यांच्या स्तवनाचा लाभ भाविकांनी घेतला. तत्पुर्वी श्री मुर्तींची ग्रामप्रदक्षिणा (मिरवणूक) करण्यात आली. सुरु असलेल्या शिवमहात्म्य सोहळा दरम्यान येथील शिवभजनी मंडळाने भजन सादर केले. अशोकभाई घाटे, ब्रम्हकुमारी पूनम दीदी यांनी उपस्थित भाविकांना संबोधित करु न मार्गदर्शन केले. सुंदर दिसत असलेले महाशिविलंग आणि नंदीच्या मूर्तीने भाविकांचे ध्यान वेधून घेतले होते. या सोहळ्यादरम्यान सुरगाणा शहरातील व तालुका परिसरातून आलेल्या शिवभक्त उपस्थित होेते.संपूर्ण धार्मिक विधीवत सोहळ्यात शिविलंगासह सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व शिखर कलश प्रतिस्थापना करण्यात येऊन महाआरती व महाप्रसाद करण्यात आला. याप्रसंगी देवस्थान कमिटीसह शहरातील सर्व महिला, नागरिक व तालुका परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.

 

 

Web Title: Restoration of Mahadev Temple at Surgana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.