सटाणा आगाराची पुन्हा दंडेलशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:12 PM2018-08-04T19:12:18+5:302018-08-04T19:12:43+5:30

नाशिकहून ओझरला येणाऱ्या प्रवाशांना अजूनही सटाणा आगारचा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिक-सटाणा व सटाणा-पुणे या दोन्ही बसमधील प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, शिवसेनेने केलेल्या गांधीगिरी आंदोलनानंतर काही दिवस स्थानकात येणाºया गाड्या आता पुन्हा महामार्गाची सरळ वाट धरीत आहेत.

Restoration of Satana Agony again | सटाणा आगाराची पुन्हा दंडेलशाही

सटाणा आगाराची पुन्हा दंडेलशाही

Next

वृद्धाला उतरवले महामार्गावर
ओझर : नाशिकहून ओझरला येणाऱ्या प्रवाशांना अजूनही सटाणा आगारचा त्रास सहन करावा लागत आहे. नाशिक-सटाणा व सटाणा-पुणे या दोन्ही बसमधील प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, शिवसेनेने केलेल्या गांधीगिरी आंदोलनानंतर काही दिवस स्थानकात येणाºया गाड्या आता पुन्हा महामार्गाची सरळ वाट धरीत आहेत.  तिकीट ओझरचे पण उतरा महामार्गावर हा घरगुती नियम पुन्हा जोरात अमलात येऊ पाहत असताना एक वृद्धाला याचाच प्रत्यय आला. नाशिकहून सुटलेली सटाणा बस क्र मांक एमएच १४ बीटी ४८९३ व सटाणा-पुणे एमएच १४ बीटी ४१७६ या दोन्ही गाड्या दहा मिनिटांच्या अंतरावर सीबीएस येथून सुटतात; परंतु बसमध्ये बसल्याबरोबर वाहक जोरात ओरडून सांगतात ओझर बाहेर थांबेल; परंतु तिकिटावर मात्र ओझर स्पष्ट नमूद असताना बाहेर महामार्गावर उतरवण्याचा कोणता नियम आहे? असा सवाल प्रवासी विचारीत असताना काही वाहक अगोदरच सांगितले होते, अशी टोकाची भाषा वापरतात. एकूणच दररोज होणाºया त्रासावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे. अनेक व्यापारी,चाकरमाने,आरोग्य तपासणीसाठी नियमित जाणाºया वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. उद्धट भाषा वापरणाºया वाहकांवर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे.

 

Web Title: Restoration of Satana Agony again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.