समर्थ स्थापित मारुती मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:29 PM2019-09-17T22:29:02+5:302019-09-18T00:30:08+5:30
टाकळी येथील श्री मारु ती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी मठ नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
नाशिक : टाकळी येथील श्री मारु ती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री रामदास स्वामी मठ नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
आगर टाकळी येथील या मठ मंदिराचे परिसर सुशोभिकरण, नूतनीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्यातर्फे ३ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून नूतनीकरणाचे काम करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एस. टी. पांडेय यांनी न्यासाला ५१ हजार रुपयांची देणगी देऊन जीर्णोद्धार सहकार्याबद्दल शासनासह पर्यटन विभाग, सार्वजनिक खाते, सर्व देणगीदार आणि भाविकांना धन्यवाद दिले.
न्यायमूर्ती पांडेय , नीलम पांडेय यांच्यासह विश्वस्त सुधीर शिरवाडकर, अॅड. भानुदास शौचे, जोेतिराव खैरनार, प्रा. राम कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार केले. विश्वस्त खैरनार यांनी प्रास्ताविक, तर विश्वस्त शिरवाडकर यांनी आभार मानले. विश्वस्त अॅड. शौचे यांनी सूत्रसंचालन केले. पुणेरी पगडी, शेला, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.
भाविकांसाठी सुविधा
लोकार्पणप्रसंगीचा मंदिर प्रवेश, कोनशिला पूजन, प्रसंगीचे पौरोहित्य कौस्तुभशास्त्री शौचे, राम नाचण, रमेश कुलकर्णी यांनी केले. जीर्णोद्धाराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी श्री हनुमान, श्री समर्थ रामदास स्वामी भक्तमंडळी यांनी भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या.