निर्बंध लागू : सावधान....१५मार्चनंतर नाशकात लग्नसोहळे घरगुती स्वरुपात : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 09:43 PM2021-03-08T21:43:38+5:302021-03-08T21:46:38+5:30

शहरी व ग्रामिण नाशिककरांनी कोरोना संसर्गाबाबत कुठलाही निष्काळजीपणा दाखवू नये. अधिकाधिक काळजी घेत मास्क, सॅनिटायझरचा वापर करत वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यावर भर द्यावा.

Restrictions apply: Caution .... Wedding ceremonies in Nashik after March 15 in domestic format: Collector Suraj Mandhare | निर्बंध लागू : सावधान....१५मार्चनंतर नाशकात लग्नसोहळे घरगुती स्वरुपात : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

निर्बंध लागू : सावधान....१५मार्चनंतर नाशकात लग्नसोहळे घरगुती स्वरुपात : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व धार्मिक स्थळं सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले सर्व धार्मिक स्थळं शनिवार व रविवारी पुर्णपणे बंद राहणार.बार, हॉटेल संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहतील

नाशिक : नाशकात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काही निर्बंध लागू करत १५मार्चनंतर सर्व विवाहसोहळ्यांना सामुहिकरित्या पार पाडण्याबाबतची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.८) रात्री जाहीर केले. तसेच सर्व धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच खुली राहतील आणि हीच वेळमर्यादा जीवनावश्यक वस्तुंची विक्रीची दुकाने वगळता अन्य सर्व दुकानांनाही लागू असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. एकुणच मार्च महिन्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता काही निर्बंध लागू करण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात सोमवारी नव्याने ६७५ कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे कोरोना संसर्गाचा वेग हा वाढत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून काही निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून घातले जात असल्याचे मांढरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले, शहरी व ग्रामिण नाशिककरांनी कोरोना संसर्गाबाबत कुठलाही निष्काळजीपणा दाखवू नये. अधिकाधिक काळजी घेत मास्क, सॅनिटायझरचा वापर करत वेळोवेळी हात स्वच्छ धुण्यावर भर द्यावा. परस्परांमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर राखण्यास प्राधान्य द्यावे आणि आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडून त्वरित उपचार करुन घ्यावेत, जेणेकरुन कोरोनाला अटकाव करण्यास यश येईल.

असे आहेत नवे निर्बंध

* जिल्ह्यात नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगावमध्ये सर्व शाळा, खासगी क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद.
* दहावी, बारावीच्या शाळा पालकांच्या संमतीनुसार चालतील.
*जीवनावश्यक वस्तु विक्रीची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील.
*१५ मार्चनंतरच्या सर्व विवाह सोहळ्यांना परवानगी नाही.
* बार, हॉटेल संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.
* व्यायामशाळा, फिटनेस सेंटरमध्ये केवळ व्यक्तीगत वापर सुरु राहील.
* सर्व धार्मिक स्थळं सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहतील; मात्र शनिवार व रविवारी पुर्णपणे बंद राहणार.
* गर्दी जमविणाऱ्या राजकीय कार्यक्रमांवर बंदी
* भाजी मंडईमध्ये ५० टक्के क्षमतेने परवानगी.

Web Title: Restrictions apply: Caution .... Wedding ceremonies in Nashik after March 15 in domestic format: Collector Suraj Mandhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.