निर्बंधांचा फळभाज्यांना मोठा फटका; डाळीच्या दरात तेजी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:22+5:302021-04-19T04:13:22+5:30
चौकट- मेथी ८५ रुपये जुडी फळभाज्यांचे भाव घसरले असले तरी पालेभाज्यांचे भाव मात्र टिकून आहेत. मेथीची आवक खूपच कमी ...
चौकट-
मेथी ८५ रुपये जुडी
फळभाज्यांचे भाव घसरले असले तरी पालेभाज्यांचे भाव मात्र टिकून आहेत. मेथीची आवक खूपच कमी झाल्याने नाशिक बाजारात मेथील ८५ रुपये जुडीपर्यंतचा दर मिळाला.
चौकट-
तूरडाळ १२० रुपये किलो
मागील सप्ताहापासून डाळींचे दर वाढत असून किरकोळ बाजारात तूरडाळ १२० रुपये तर चनाडाळ ८० ते ८५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. खाद्यतेलही चांगलेच तापले आहे.
चौकट-
सफरचंद ९० रुपये किलो
नाशिक बाजार समितीत सफरचंदाची आवक कमी झाली असून दर वाढले आहेत सफरचंद ९० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. खरबज, आंबा, केळी या फळांचीही आवक टिकून आहे.
कोट-
मागील वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. यावेळी तशी वेळ येऊ नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मालविक्रीसाठी सहकार्य करायला हवे.
- गौतम आहिरे, शेतकरी
कोट-
राज्य शासनाने कठोर निर्बंधाची घोषणा केल्यानंतर ग्राहकांची किराणा दुकानांमध्ये गर्दी झाली होती. अनेक दुकानदारांनी मागील वर्षीच्या परिस्थितीचा पुन्हा अनुभव घेतला त्यानंतर मात्र पुन्हा बाजार सुस्तावला आहे.
- शेखर दशपुते, किराणा व्यापारी
कोट-
ऐन पापड, मसाले करण्याच्या काळातच डाळी, तेल महागले आहे. किरकोळ बाजारात आमच्या सारख्या सर्वसामान्य ग्राहकांना भाज्या चढ्या भावानेच खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागतो.
- रजनी कांबळे, गृहिणी