धार्मिक स्थळांवरील निर्बंधही शिथिल करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:36+5:302021-07-30T04:15:36+5:30
----------------- धुरळा फवारणीची मागणी नाशिक : शहरातील सततच्या रिपरिप पावसाने मुख्य रस्त्यानजीकच्या अनेक लहान-मोठ्या खड्ड्यांमध्ये तळी साचली आहेत. या ...
-----------------
धुरळा फवारणीची मागणी
नाशिक : शहरातील सततच्या रिपरिप पावसाने मुख्य रस्त्यानजीकच्या अनेक लहान-मोठ्या खड्ड्यांमध्ये तळी साचली आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे शहरात डासांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक परिसरात धुरळा फवारणी करण्याची मागणी मनपाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
------
रेनकोट, छत्री दुकानांमध्ये गर्दी
नाशिक : सततच्या पावसाने शहरातील छत्री विक्रेते तसेच रेनकोटच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागल्याचे चित्र आहे. पाऊस संततधार पडत असल्याने त्याला टाळता येणे शक्य होत नसल्याने नागरिकांनी रेनकोट खरेदी करण्याला पसंती दिली आहे.
----
सायरनच्या आवाजात घट
नाशिक : महानगरातील कोरोना रुग्णसंख्या घटली असल्याने शहरातून सातत्याने आवाज करीत फिरणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनच्या आवाजातही बरीच घट आली आहे, अन्यथा दिवसभरात कोणत्याही वेळी रस्त्यावर बाहेर पडल्यास दोन-तीन ॲम्ब्युलन्स आवाज करीत जात होत्या. मात्र, एकुणात रुग्ण कमी झाल्याचे चित्र रस्त्यावरही दिसत आहे.
-----
सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ
नाशिक : जिल्ह्यात गत आठवडाभरापासून झालेल्या पावसाने शहरातील सर्दी, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मनपा तसेच खासगी दवाखान्यांमध्येदेखील सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. तसेच मेडिकलबाहेरील गर्दीतही वाढ होऊ लागली आहे.