शिवजयंती उत्सवावर घातलेले निर्बंध अन्यायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:08+5:302021-02-17T04:19:08+5:30
सिन्नर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्साहात करण्याचे संकेत मिळत असताना अचानक ...
सिन्नर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्साहात करण्याचे संकेत मिळत असताना अचानक शासनाने परिपत्रक जारी करून जाचक अटी घातल्या. शासनाने हे निर्बंध त्वरित मागे घेऊन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी दिलासा द्यावा, अशी मागणी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले यांनी केली.
येथील शासकीय विश्रामगृहात शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात शासनाच्या परिपत्रकावर नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक मित्रमंडळानी वाद्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन एक महिन्यांपासूनच केला आहे. त्याचा खर्च शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास व्यर्थ जाईल त्याला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. बैठकीस आनंदा सालमुठे, शिवशाहीर स्वप्निल डुंबरे, सुभाष कुंभार, वामन पवार, सचिन देशमुख, पांडुरंग वारुंगसे, संकल्प भालेराव, प्रशांत निचित, मंगेश पवार यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक दत्ता वायचळे यांनी केले. राजाराम मुंगसे यांनी सूत्रसंचालन केले. श्यामसुंदर झळके यांनी आभार मानले.