कोरोना रोखण्यासाठी पुढील आठवड्यापर्यंत निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 01:35 AM2021-03-15T01:35:08+5:302021-03-15T01:35:40+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १० तारखेपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. काेरोना रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणि मास्क परिधान करणे हाच प्रभावी पर्याय असल्याने पुढील आठवड्यात याबाबत अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १० तारखेपासून जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. काेरोना रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणि मास्क परिधान करणे हाच प्रभावी पर्याय असल्याने पुढील आठवड्यात याबाबत अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात काेरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. गेल्या १० तारखेपासून निर्बंधाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातही निर्बंध कायम ठेवण्याचा येणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत दुकाने सुरू राहतील. शनिवार आणि रविवारी बाजारपेठा बंद राहाणार आहेत. गर्दीतून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे हाच निर्बंधामागचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.१५) बाजारात गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. दुकानदारांनीदेखील गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रभावी अंमलजबावणी
निर्बंधातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. परंतु या दुकानांमध्ये गर्दी झाली तरी संबंधित दुकान लागलीच बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील आठवड्यात गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीची प्रभावी अंमलजबावणी केली जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.