रेसुबची सतर्कता : अभ्यासाचा कंटाळा आल्याने सोडले घर छत्तीसगडचे विद्यार्थी पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:40 PM2018-02-09T23:40:41+5:302018-02-10T00:30:27+5:30
मनमाड : पालक सारखा अभ्यास करा असा लकडा लावत असल्याने अभ्यासाचा कंटाळा आलेल्या छत्तीसगड येथील तीन विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात घर सोडले व मनमाड गाठले;
मनमाड : पालक सारखा अभ्यास करा असा लकडा लावत असल्याने अभ्यासाचा कंटाळा आलेल्या छत्तीसगड येथील तीन विद्यार्थ्यांनी रागाच्या भरात घर सोडले व मनमाड गाठले; मात्र येथील रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे या अल्पवयीन बालकांना भरकटण्याच्या आतच शुक्रवारी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक २२८६६ भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही गाडी मनमाड रेल्वेस्थानकावर आली असता या गाडीतून तीन अल्पवयीन मुले भेदरलेल्या अवस्थेत फलाटावर उतल्याची बाब गस्तीवर असलेले रेसुब कर्मचारी साबीर शहा यांच्या नजरेतून सुटले नाही. शहा यांना संशय आल्याने त्यांनी या मुलांना रेसुब कार्यालयात आणले. रेसुब निरीक्षक के. डी. मेरे, अधिकारी आर. के. मीना व आर. के. यादव यांनी या मुलांची कसून तपासणी केल्यानंतर हे विद्यार्थी छत्तीसगड येथून घर सोडून आले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड येथील रायगड जिल्ह्यातील विवेकानंद हायस्कूलमधील निखिल लखनसिंग (१४) बिपिन दीपक मिश्रा (१३), मोहम्मद मुमताज मो.इजहार या सहावीमध्ये शिकणाºया मुलांना त्यांचे पालक नेहमी अभ्यास करा असा लकडा लावत होते.