गा-हाणे निवारण मंचाचा वीज कंपनीविरुद्ध निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:47 PM2019-10-27T23:47:48+5:302019-10-28T00:03:53+5:30
यंत्रमागधारकास जादा बिलाची आकारणी करून वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनीस ग्राहक गाºहाणे निवारण मंचाने जादा देयक रद्द करण्याचे आदेश देण्याबरोबरच ग्राहकास नुकसानभरपाई अदा करण्याचा निर्णय दिला आहे.
नाशिक : यंत्रमागधारकास जादा बिलाची आकारणी करून वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनीस ग्राहक गाºहाणे निवारण मंचाने जादा देयक रद्द करण्याचे आदेश देण्याबरोबरच ग्राहकास नुकसानभरपाई अदा करण्याचा निर्णय दिला आहे.
मालेगाव येथील यंत्रमागधारक रिझवान अहमद व अजहर हुसेन अन्सारी या दोघांच्या यंत्रमागाच्या वीज जोडणीचे मार्च २०१६ चे वीज मीटरचे फोटो घेण्यात आले होते. मात्र त्यांना वापरलेल्या वीज युनिटपेक्षाही दुसºयाच वीज मीटरच्या वापराचे बिल वीज कंपनीने दिले. दोन्ही यंत्रमागधारकांना साधारणत: दरमहा आठ हजार रुपये वीज बिल येत असताना कंपनीने त्यांना ४४ हजार व एक लाख ३६ हजार असे बिल दिले. या वाढीव बिलाबाबत अझहर हुसेन यांनी मालेगावी वीज कंपनीच्या उपविभागीय अधिकाºयाकडे तक्रार केली असता, त्यांनी अगोदर बिल भरा मगच तक्रार नोंदवून घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, दोन्ही यंत्रमागधारकांनी वीज कंपनीचे वाढीव देयक भरण्यास नकार दिला असता, वीज कंपनीने २५ मार्च २०१६ ते ३ एप्रिल २०१९ या काळात दोघांचाही वीजपुरवठा खंडित केला. त्यावर अजहर हुसेन यांनी ५४ हजार रुपये भरल्यावर त्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. या त्रासाविरुद्ध अजहर हुसेन यांनी वीज ग्राहक न्यायमंचात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
वीज कंपनीने रिझवान अहमद व अजहर हुसेन यांची दहा दिवस वीज बेकायदेशीर बंद केली म्हणून वीज कंपनीने दररोज १२०० रुपये भरपाई देण्याचे तसेच या ग्राहकांना जादा आकारलेली बिले रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकास बिल दुरुस्त करून दिले नाही, म्हणून विलंबासाठी प्रतिमाह चारशे रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी, असे आदेश दिले.