आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांना फटका महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम रद्द झाल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:38 AM2020-12-04T04:38:06+5:302020-12-04T04:38:06+5:30

घटनाकाराला महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करत असतात. तेथे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरी साहित्य खरेदी करतात. ...

As a result of cancellation of Mahaparinirvana Day program | आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांना फटका महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम रद्द झाल्याचा परिणाम

आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांना फटका महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम रद्द झाल्याचा परिणाम

Next

घटनाकाराला महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करत असतात. तेथे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकरी साहित्य खरेदी करतात. त्यासाठी पालिका चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात पुस्तक विक्रीचे ३००पेक्षा अधिक स्टॉल्स उपलब्ध करून देते. तसेच पदपथांवर साधारणतः ७००पेक्षा अधिक पुस्तक विक्रीची दुकाने थाटण्यात येतात. त्याशिवाय धातूची मूर्ती, कॅसेटची मोठी विक्री चैत्यभूमीवर होते. चार दिवसांत एक कोटीपेक्षा अधिक पुस्तकांची विक्री होत असून, ५० कोटी रुपयांच्या आंबेडकरी साहित्याची विक्री होते.

महापरिनिर्वाण दिनाच्या १५ दिवसांपूर्वीच एक विक्रेता दोन ते पाच लाखांचे साहित्य मागवतो. विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपयांची कमाई करता येते. मात्र, यावेळी कोरोनामुळे आम्ही पुस्तकांची मागणी केली नसल्याचे बुद्ध, फुले, शाहू, कबीर, आंबेडकर साहित्य विक्रेते यांनी सांगितले. धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दरम्यान आमचा ९० टक्के व्यवसाय होतो. यावेळी मात्र आम्हाला दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे साहित्य विक्रेत्यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवस भीमगिते, तसेच चळवळींच्या गीतांचा कार्यक्रम होतो. त्यात शेकडो कलाकार सहभागी होतात. अनेक नव्या ऑडिओ तसेच व्हिडिओ अल्बम यावेळी प्रकाशित होतात. यंदा कार्यक्रमच रद्द झाल्याने त्याचा मोठा फटका लोककलावंतांना बसला आहे.

- विष्णू शिंदे, अध्यक्ष, लोक कलावंत, सांस्कृतिक मंच

Web Title: As a result of cancellation of Mahaparinirvana Day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.