डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:16 AM2018-05-31T00:16:48+5:302018-05-31T00:16:48+5:30
डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ९८ टक्के लागला.
इंदिरानगर : डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ९८ टक्के लागला. डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली असून, या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विज्ञान व वाणिज्य शाखेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत वर्षा गोफणे हिने ८०.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय युरेका चोरडिया हिने ७६.५० टक्के, तर परिमल देसाई याने ७४.३० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक गणेश बोराडे याने ७८.३० टक्के गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्रमांक तृप्ती शिरसाठ हिने ७७.६० टक्के, तर प्राची दोंदे हिने ७५.३८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या विद्यार्थ्यांना अॅड. ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, अॅड. अंजली पाटील, अनिल भंडारी, वसंतराव कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, छाया निखारे, अॅड. मुग्धा सापटनेकर, प्राचार्य शरद गिते, सारिका पारखी, स्मिता चव्हाण, दीपमाला कदम, नितीन शेटे आदींचे मार्गदर्शन लाभले.