विनयभंग प्रकरणी अवघ्या दोन महिन्यांत निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:24 AM2018-07-01T01:24:48+5:302018-07-01T01:25:30+5:30

जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून, यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़ बेलदारवाडी, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़ ७ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरीरोड परिसरात नळाचे पाणी भरीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून आरोपी चव्हाण याने विनयभंग केल्याची घटना घडली होती़

The result of molestation case in just two months | विनयभंग प्रकरणी अवघ्या दोन महिन्यांत निकाल

विनयभंग प्रकरणी अवघ्या दोन महिन्यांत निकाल

Next

नाशिक : जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या दोन महिन्यांत अल्पवयीन मुलगी विनयभंग खटल्याचा निकाल दिला असून, यातील आरोपी राजू मोतीराम चव्हाण (रा़ बेलदारवाडी, म्हसरूळ) यास शनिवारी (दि़३०) तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़ ७ जानेवारी २०१८ रोजी दिंडोरीरोड परिसरात नळाचे पाणी भरीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून आरोपी चव्हाण याने विनयभंग केल्याची घटना घडली होती़  ७ जानेवारी २०१८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकरा वर्षीय मुलगी घरात नळाचे पाणी भरीत होती़ मुलगी एकटीच असल्याची संधी साधून ४२ वर्षीय आरोपी राजू चव्हाण हा बळजबरीने घरात घुसला़ तिला उचलून घेत तिचा विनयभंग केला व पळून गेला़
अवघ्या २० दिवसांत निकाल
७ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या अल्पवयीन मुलगी विनयभंग गुन्ह्यात ८ जानेवारीला म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक सी़ एस़ पाटील यांनी तीन महिन्यांच्या कालावधीत ९ एप्रिल २०१८ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ तर ११ जूनला न्यायालयात या खटल्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या २० दिवसांत हा खटला चालवून समोर आलेल्या पुराव्यांवरून दोषी ठरवित आरोपीस शिक्षा सुनावली़

Web Title: The result of molestation case in just two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक