नाशिक विभागाचा निकाल ९२ टक्के; विभागात जळगाव टॉपवर

By Sandeep.bhalerao | Published: June 2, 2023 03:02 PM2023-06-02T15:02:10+5:302023-06-02T15:02:46+5:30

नाशिक विभागाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४४ इतकी आहे तर विभागात जळगाव जिल्हा ९३.५२ टक्क्यांसह टॉपवर आहे.

Result of Nashik Division 92 percent; Jalgaon tops in the division | नाशिक विभागाचा निकाल ९२ टक्के; विभागात जळगाव टॉपवर

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext


नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेत नाशिक विभाग सलग दुसऱ्या वर्षी तळाला गेला आहे. विभागाचा निकाल ९२.२२ टक्के इतका लागला असला तरी नऊ विभागीय मंडळात नाशिक राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, नाशिक विभागाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.४४ इतकी आहे तर विभागात जळगाव जिल्हा ९३.५२ टक्क्यांसह टॉपवर आहे.

 नाशिक विभागाचा दहावी परीक्षेचा निकाल यंदा घसरला असून गत वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी कमी आहे. मागीलवर्षी ९५.९० इतकी निकालाची टक्केवारी होती तर यंदा ९२.२२ टक्के इतका निकाल लागला आहे. नाशिक विभागातून १ लाख ९२ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ७७ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४४ तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९०.३५ टक्के इतकी आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील मुलींनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.

विभागात जळगाव जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक लागला. जळगाव जिल्ह्याची टक्केवारी ९३.५२ टक्के इतकी आहे. त्या खालोखाल नंदुरबार जिल्ह्याचा निकाल असून ९३.४१ इतकी निकालाची टक्केवारी आहे. तर धुळे जिल्ह्याचा निकाल ९२.२४ इतका लागला असून सर्वात कमी निकाल नाशिक जिल्ह्याचा लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९३.९५ टक्के इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असतानाही निकाल मात्र कमी लागला आहे. मुलींच्या निकालात देखील जळगावनेच बाजी मारली. ९५.५९ टक्के इतकी मुलींच्या निकालाची टक्केवारी आहे.

विभागीय निकालाची टक्केवारी
जिल्हा मुले-मुली            टक्केवारी

नाशिक ९०.७७ ९३.७७ ९१.१५
धुळे            ९०.७७ ९४.०७ ९२.२४

जळगाव ९१.८९ ९५.५९ ९३.५२
नंदुरबार ९०.३५ ९४.४४ ९२.२२

Web Title: Result of Nashik Division 92 percent; Jalgaon tops in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.