‘ओखी’ वादळाचा परिणाम; शहरावर दाटले ढगकिमान तपमानात वाढ :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:45 AM2017-12-05T00:45:41+5:302017-12-05T00:50:59+5:30
शहरातील थंडी अचानक झाली गायब; १६.१ अंश तपमानाची नोंद
नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानक वेगाने वाढू लागल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे; मात्र ढगाळ हवामानामुळे दिनकराचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा दोन दिवसांत थेट १६.१ अंशावर पोहोचला. दक्षिण भारतातून गोवामार्गे गुजरातकडे सरकणाºया ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्टÑात पावसाची तर उत्तर महाराष्टÑात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
सोमवारी (दि.४) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर होते. वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे उत्तर महाराष्टÑात काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून, थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो. ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून, दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ओखी वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरीक्षण केंद्राने वर्तविली आहे. कारण दोन दिवसांपूर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सूर्यप्रकाशही होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले. गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपूर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गानेरूप बदलले असून, आज जोरदार पावसाची शक्यतानाशिक : ‘ओखी’मुळे शहरावर ढग दाटले असून, हवामान खात्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त माहितीनुसार गुजरात-सौराष्टÑासह मुंबई आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात, सौराष्टÑासह मुंबईमध्ये सोमवारी जोरदार पाऊस झाला. पावसासोबत वादळी वाराही जोरात होता. संध्याकाळी ५ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनससह गेटवे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट या भागाला दीड तास पावसाने जोरदार झोडपले. मंगळवारी (दि.५) नाशिकसह पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्टÑात वाºयाचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे. वाºयाचा वेग वाढून ७० कि.मी. प्रती तासही होऊ शकतो. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.