नीट परीक्षेचा निकाल जाहीर; नाशिकच्या टॉपर्समध्ये भराडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:16 AM2018-06-05T00:16:15+5:302018-06-05T00:16:15+5:30
वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे ६ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकच्या टॉपर्समध्ये असलेल्या विश्वेश मिलिंद भराडिया याने ६६५ गुण मिळवून आॅल इंडिया रँकमध्ये ५१वे स्थान पटकावत देशभरातील शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान अधोरेखित केले आहे.
नाशिक : वैद्यकीय शाखेच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसईतर्फे ६ मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ४) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकच्या टॉपर्समध्ये असलेल्या विश्वेश मिलिंद भराडिया याने ६६५ गुण मिळवून आॅल इंडिया रँकमध्ये ५१वे स्थान पटकावत देशभरातील शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान अधोरेखित केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) ६ मे रोजी परीक्षा घेण्यात आलेल्या नॅशनल इलिजिबिलिटी टेस्टमध्ये (नीट) नाशिक च्या विश्वेश भराडिया याने आॅल इंडिया रँकमध्ये ५१ वे स्थान पटकावले आहे. विश्वेश भराडिया याला पीसीबीत ७२० पैकी ६६५ गुण मिळाले असून, फिजीक्समध्ये १८० पैकी १७०,केमेस्टीत १८० पैकी १५५, तर बायोलॉजीत ३६० पैकी ३४० असे एकूण ६६५ गुण मिळाले. त्याने सर्वसाधारण गटात ४२ वी रँक प्राप्त केली आहे. विश्वेशचे वडील मिलिंद व आई वैशाली हे दोघेही डॉक्टर असून, विश्वेसने नीटमध्ये देदीप्यमान यश संपादन करून भराडिया कुटुंबाची भावी पिढीही वैद्यकीय सेवेत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आरवायके महाविद्यालयातील विद्यार्थी असलेल्या विश्वेशला जोशीज लर्निंग सेंटरच्या डॉ. रोहित जोशी व प्रा. श्यामकांत आचार्य यांचेही मार्गदर्शन लाभले. नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
नीटमध्ये नाशिकचे यशस्वी विद्यार्थी
नाशिकमधील प्रथमेश फडके (६२५), नीरज पंडित (६१२), उदिता बजाज (६०२), पुष्टी देवी (५८१), त्रिंबकेश लिंगधाली (५७९), यश अग्रवाल (६७३), यशराज खरडे (५५६), निसर्ग धामने (५५५), ध्यानी व्यास (५५४), गुंजन गुजराथी (५५३), भुपाली कमलास्कर (५४५), ध्रुव तिवारी (५४४), राकेश अय्यर (५४२), मंजूषा क्षीरसागर (५४०), साहिल संगोराम (५३९), प्रेरणा पंजवानी (५३८), विनीत पाटील (५३६), प्रतीक गिरासे (५३२), अदित पाटील (५१६), रेणू जोशी (५०७), तेजस बनकर (५०३), श्रेया चितोडे (५००) यांसह शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी ४०० हून अधिक गुण मिळवून नीटमध्ये यश संपादन केले असून, यातील बहुतांश विद्यार्थी एमबीबीएससह बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.