खरीप हंगाम बीज प्रक्रिया ऑनलाइन स्पर्धेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:26+5:302021-09-03T04:15:26+5:30
१४ मे ते १५ जुलै दरम्यान स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत ६२०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. यापैकी २३९० ...
१४ मे ते १५ जुलै दरम्यान स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेत ६२०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. यापैकी २३९० शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ बनवून सक्रिय सहभाग नोंदवल्याचे राज्य मुख्य समन्वयक सुखदेव जमधडे यांनी सांगितले.
विजेत्यांना लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कृषी विस्तार संचालक विकास पाटील, कृषी सहायक संघटनांचे अध्यक्ष बापूसाहेब शेंडगे यांचे मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय केमिकल फिर्टिलायझरचे मधुकर पाचारणे, रमेश कदम आदींचे सहकार्य लाभले. जिल्हा समन्वयक म्हणून चांदवडच्या कृषी सहायक स्वाती झावरे यांनी काम पाहिले.
चौकट-
सर्वसाधारण गटातील विजेते पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण गटातील विजेत्यांमध्ये प्रथम : दिग्विजय सुनील जाधव, कानळद, ता. निफाड. द्वितीय : रवींद्र काशिनाथ मते, शिवाजीनगर, ता. चांदवड, तृत्तीय : इंदुमती सोमनाथ घोलप, देवगाव, ता. चांदवड.
चौकट-
‘बीजप्रक्रिया लोकचळवळ व्हावी’
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध पद्धतीने बीजप्रक्रिया तंत्रज्ञान सांगावे, बीजप्रक्रिया लोकचळवळ व्हावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा, हे उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागे असल्याचे प्रतिपादन स्पर्धेचे राज्य सहसमन्वयक प्रदीप भोर यांनी केले.