सेट परीक्षेचा निकाल ४.१३ टक्के
By admin | Published: September 8, 2016 01:52 AM2016-09-08T01:52:42+5:302016-09-08T01:52:54+5:30
सेट परीक्षेचा निकाल ४.१३ टक्के
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे २९ मे २०१६ रोजी घेण्यात आलेल्या राज्य पात्रता चाचणी (सेट) परीक्षेचा निकाल ४.१३ टक्के लागला आहे. राज्यभरातील तब्बल दोन हजार ८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून, यंदा निकालात सुधारणा झाली आहे. परीक्षेसाठी राज्यभरातून ७० हजार १०१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील दोन हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुधारणा दिसत असली तरी परीक्षार्थींच्या तुलनेत निकाल कमीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, सहायक प्राध्यापक पदासाठी सेट-नेट परीक्षा सक्तीची केल्याने
परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थीसंख्या कमी असल्याने दो
न ते अडीच टक्के निकाल लागण्याची परंपरा आहे.