तीन राज्याचा निकाल म्हणजे लोकसभेचा ट्रेलर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 06:35 PM2018-12-18T18:35:51+5:302018-12-18T18:36:17+5:30
योगेंद्रसिंग कटार : क्षत्रिय राजपूत एकता महासंमेलन
सटाणा : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचे निकाल हा लोकसभा निवडणुकीचा ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. राजपूत समाजाकडे दुर्लक्ष केल्यानेच या तीन राज्यात भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली. यापुढे जो पक्ष आमच्या मागण्यांचा विचार करणार नाही, त्यांना आम्ही असाच धडा शिकवीत राहू, असा इशारा राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंग कटार यांनी दिला.
बागलाण तालुका करनी सेनेतर्फेआयोजित राज्यस्तरीय क्षत्रिय राजपूत एकता महासंमेलन व ‘राजपुताने का बब्बर शेर’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंग गोगामेडी यांना ‘क्षत्रिय हृदय सम्राट’ ही पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न झाला.येथील लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती धनसिंग वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगराध्यक्ष सुनील मोरे, डॉ. शेषराव पाटील, राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके,उदेसिंग अण्णा पवार, राज शेखावत, डॉ. संजय सोनवणे, चेतनिसंग राजपूत, जीवनसिंग शेरपूर, डॉ. विलास बच्छाव आदि उपस्थित होते. यावेळी सुखदेवसिंग गोगामेडी यांनी सांगितले, देशभरातील राजपूत समाजाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने आज समाजाची अपरिमित हानी झाली आहे. जोपर्यंत समाज एका छताखाली येत नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणे अवघड असल्याचे सांगितले. राजपूत समाजाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी देशभरात साडेआठ टक्के असलेल्या राजपूत समाजाच्या साडेआठशे संघटना आहेत. येत्या काळात या साडेआठशे संघटनांच्या प्रमुखांना एकत्रित करत एकाच व्यासपीठावर संमेलन घेण्याची आवश्यकता असून शासनाशी लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके, डॉ. शेषराव पाटील आदींचीही भाषणे झाली. सोहळ्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमूख जयप्रकाश सोनवणे, सरदारिसंग जाधव, डॉ. दिकपाल गिरासे, लकी गिल, दीपक पाकळे, नीलेश पाकळे, दरबारिसंग गिरासे, सोनाली ठाकुर, सोनाक्षी सोनवणे, शालिनी पाटील,आदींसह राज्यभरातील समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.