सेवानिवृत्त शिक्षिकेला गंडा घालणाऱ्या महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:05+5:302021-07-20T04:12:05+5:30

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानक परिसरालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त शिक्षिका मीना शिरसाठ (६१, ...

Retired teacher arrested | सेवानिवृत्त शिक्षिकेला गंडा घालणाऱ्या महिला ताब्यात

सेवानिवृत्त शिक्षिकेला गंडा घालणाऱ्या महिला ताब्यात

Next

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानक परिसरालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त शिक्षिका मीना शिरसाठ (६१, रा. वणी) यांनी ५० हजार रुपये काढले. त्यापैकी ४४ हजार रुपये कापडी पिशवीत ठेवून ती दुसऱ्या बॅगेत ठेवली. खांद्याला बॅग अडकवून त्या आपल्या बहिणीसोबत वणी बसस्थानक येथे आल्या. येथे नाशिकला जाणाऱ्या बसची प्रतीक्षा केल्यानंतर कळवण -नाशिक या बसमध्ये त्यांनी प्रवेश केला. गाडीत बसण्यासाठी जागेची शोधाशोध केली. मात्र, जागा नसल्याने दुसरी बस पकडण्यासाठी त्या खाली उतरत असताना पुढे एक व मागे एक अशा दोन महिलांनी मीना शिरसाठ यांना दाबून ठेवले व नकळत पिशवीची चेन उघडून ४४ हजार रुपये ठेवलेली पिशवी लांबविली. मीना शिरसाठ या खाली उतरल्यानंतर त्यांना बॅगेची चेन उघडी असल्याचे दिसले. बॅगेची तपासणी केली असता रोख रकमेसह पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तडक वणी पोलिसात धाव घेतली व घडलेला प्रकार कथन केला. सदर माहिती सरकारी कामासाठी जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांना कळविण्यात आली. तोपर्यंत सदरची एसटी वणी बसस्थानक सोडून नाशिक येथे जाण्यास निघाली होती. स्वप्नील राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, प्रदीप शिंदे, अण्णा जाधव, माया बर्डे या पथकाने तातडीने खासगी वाहनाने गाडीचा पाठलाग केला. अवनखेड फाट्याजवळ सदरची एस. टी. दिसताच पोलीस गाडी त्यापुढे आडवी लावण्यात आली. एस. टी. चालक व प्रवाशांना घटनेची माहिती देण्यात आली. याचवेळी संबंधित महिलांची संशयास्पद हालचाल पोलिसांनी टिपली व या महिलांना खाली उतरविले. शिरसाठ यांनी या महिलांना ओळखल्यानंतर तपासणीत त्यांच्याकडून ४४ हजार रुपयांची पिशवी हस्तगत करण्यात आली.

इन्फो

संशयिताने स्वत:ला केले जखमी

काजल अकिल काटकी व ज्योती अकिल काटकी अशी या दोन संशयित महिलांची नावे आहेत. पोलीस ठाण्यात या दोघांना आणत असताना काजल काटकी हिने स्वतःच्या डोक्यात काहीतरी वस्तूने प्रहार करत स्वतःला जखमी करून घेतले. सोबत असलेल्या लहान मुलांना चिमटे घेत आरडाओरडा सुरू केला. काजल हिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून त्या दोन संशयित महिलांवर संगनमताने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिलांची टोळी असण्याची शक्यता गृहीत धरून लवकरच अनेक गुन्हे उघडकीस येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: Retired teacher arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.