भाविक परतीच्या प्रवासाला...

By admin | Published: January 24, 2017 10:40 PM2017-01-24T22:40:17+5:302017-01-24T22:40:44+5:30

भाविक परतीच्या प्रवासाला...

On the return journey of the devotee ... | भाविक परतीच्या प्रवासाला...

भाविक परतीच्या प्रवासाला...

Next

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य द्वादशीला एकादशीचा उपवास काल्याच्या कीर्तनाने सोडून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या यात्रेची सांगता झाली. त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या भाविकांनी निवृत्तिरायांचे दर्शन घेत जड अंत:करणाने त्र्यंबकेश्वर सोडले. दिंडीने आलेले भाविक ट्रॅक्टर, ट्रक आदि वाहनांमधून गावाकडे परतू लागले आहेत. अनेकांनी परिवहन महामंडळाच्या बसेसने परतीचा प्रवास सुरू केला आहे.
यात्रेत १२ ते १५ महिला खिसेकापू पकडण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व तरुण स्त्रिया असून, आपले कौर्यकृत्य करताना त्यांच्या कडेवर लहान बालके असतात. या खिसेकापू पकडल्या तरी पोलीस ठाण्यात त्यांची झडती घेताना ते लहान मुले मोठमोठ्याने रडत अक्षरश: पोलीस ठाणे डोक्यावर घेतात. याशिवाय ज्यांची चोरी झाली आहे तेही कोणी पोलिसांकडे फिर्याद देत नाहीत. पोलीस झंझटीत न अडकता नुकसान सहन करतात आणि त्यामुळेच या महिलांचे फावते.  त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात अपघातात जखमी झालेले रुग्ण गणपत बारी, जव्हार फाटा, निवृत्तिनाथ मंदिराजवळ, कदम (पिंपळगाव बसवंत), पेट्रोलपंपासमोर असे ४ ते ५ रुग्ण जखमी होऊन नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत तर काहीजण उपचार घेत आहेत. एका यात्रेकरूचा हृदय क्रिया बंद पडून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात खिसेकापू महिलांवर केसेस दाखल करून न्यायालयात पाठविण्यात आले आहे. परिवहन मंडळाच्या बसेसची कमी नाही. एकापाठोपाठ बस सोडण्यात येत आहेत. २८३ टायमिंगव्यतिरिक्त (२००+८३ जव्हार, पालघर)जादा बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये थेट कळवण १४ बसेस, नांदगाव ९, येवला ६, लासलगाव ९, पेठ १५, सिन्नर २६, सटाणा १४, मनमाड १५, पिंपळगाव बसवंत १४, इगतपुरी १८, मालेगाव १५, नाशिक डेपो-१ - ६, नाशिक- २- २ याशिवाय जव्हार, पालघर ८३ तर नाशिक २०० ह्या बसेस रात्री १२ पासून आज दुपारी १.३० पर्यंत सोडण्यात आल्या आहेत. या बस सेवेवर स्वत: विभाग नियंत्रक यामिनी जोशी, आगार व्यवस्थापक किशोर पाटील, यात्राप्रमुख रणजित ढाकणे, स्थानकप्रमुख शरद झोले आदि लक्ष देऊन होते.  यात्रा जव्हार रोड परिसरात जास्त असल्याने या भागात व्यावसायिकांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला. बरेच व्यावसायिकांनी धंदा नाही धंदा नाही अशी तक्रार केली. अर्थात तात्पुरते, कायम दुकानदारांचा धंदा व्हायचा तो झाला आहेच.  दरम्यान, नगरपालिकेचे नियोजन चुकले. बऱ्याच भागात पथदीप बसविले नाहीत. परिणामी अंधाराचे साम्राज्य पसरले. अनेक गल्ली-बोळात सफाई न झाल्याने कचरा जमा झाला तर गर्दीमुळे घंटागाड्या बंद करण्यात आल्या. अनेक गरीब व्यावसायिकांची छोटी छोटी दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली उठविण्यात आली किंवा ट्रॅक्टरमध्ये जमा केले तर अनेक ठिकाणी रस्त्यावरच दुकाने लावली होती तिकडे मात्र लक्षच दिले नाही. दरम्यान, बुधवारी (दि. २५) मानाच्या आलेल्या दिंडीप्रमुखांचा सत्कार समाधी संस्थानतर्फे नारळ, कुंकू, उपरणे, बुक्का लावून सत्कार करण्यात येणार आहे. निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजयनाना धोंगडे, सचिव पवनकुमार भुतडा व अन्य विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. सर्व मानाच्या दिंड्यांचे प्रमुख उपस्थित असतात.














 

Web Title: On the return journey of the devotee ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.