परतीच्या पावसाने खरीपावरचे संकट गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 01:18 PM2019-10-30T13:18:44+5:302019-10-30T13:18:58+5:30
घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे.
घोटी : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक समजले जाणारे भात पीक सध्या ७० टक्के काढणीवर आलेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकाची काढणी करून पीक शेतातच पडून त्यात रोजच होणाºया परतीच्या पावसाने शेतकरी बेजार झालेले आहेत. रोजच प्रचंड वेगाने येणारे वादळी वारे आणि पाऊस यामुळं पीक पूर्णत: भुईसपाट झालेले आहे. सध्या रोजच दुपारनंतर पाऊस येत असून त्यामुळं दिवाळीच्या सणावर देखील पाणी फिरवले आहे. पावसाचे पाणी संपूर्ण खाचरांमध्ये असल्यामुळं सोंगणी ही पूर्णत: मजूर सांगून करावी लागणार आहे. भात काढणी यंत्र कोणत्याही प्रकारे शेतात वापरता येणार नाही. भात हे शेतकर्यांचे वार्षिक नगदी पीक आहे. भाताच्या होणार्या उत्पन्नातून पुढील रब्बी हंगामातील पीके अवलंबून आहेत. रब्बी हंगामात घेणारे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, कारले आदि पीके शेतकरी भात पिकातील होणाºया उत्पन्नातून घेत असतो. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण आहे. काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढून ठेवले असून रोजचा होणाºया पावसामुळं सोयाबीन शेंगा आण िदाणे काळे पडले असून तेही हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.
----------------------
यावर्षी होणार्या परतीच्या पावसाने भात पीक हातातून जाण्याच्या बेतात आहे. त्यातच या वर्षी भर पिकाची दुबार पेरणी व लागवड केलेली आहे. दुबार पेरणीच्या वेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा करून लागवड केली असतानाच आजची स्थिती घटक आहे,त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना मदत द्यावी.
- पंढरीनाथ काळे, शेतकरी पिंपळगाव मोर