जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून परवाने परत

By admin | Published: July 17, 2016 01:31 AM2016-07-17T01:31:00+5:302016-07-17T01:31:14+5:30

दबावतंत्र : बाजार समितीऐवजी शिवार खरेदी करण्याचा बैठकांमध्ये निर्णय

Return licenses to traders from the district | जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून परवाने परत

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून परवाने परत

Next

नाशिक : भाजीपाला व फळे नियमनमुक्तीच्या व शेतकऱ्यांकडून आडत न कापण्याच्या राज्य शासनाच्या अध्यादेशाविरु जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. लिलावामध्ये सामिल व्हा अन्यता परवाने रद्द करण्याच्या इशाऱ्यानंतर व्यापाऱ्यांनी स्वत:च आपले परवाने बाजार समित्यांकडे परत करत दबाव तंत्राचा अवलंब केला आहे. फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्यात आल्याने आता बाजार समित्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरेदी करणे अधिक सोपे असल्याचा दावा करत ठिकठिकाणी व्यापारी संघटनांच्या बैठका होऊन परवाने परत करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची शनिवारी अंमलबजावणी करण्यात आली.
नांदगाव : तालुक्यातील नांदगाव,बोलठाण,नायडोंगरी येथील बाजार समितीच्या आवारात खरेदीचे कामकाज करणारे सर्वच आडतदार व्यापाऱ्यांनी आज आपले परवाने बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्याकडे परत केले . बाजार समितीने या व्यापाऱ्यांना अकरा जुलै रोजी लिलाव प्रक्रि येमध्ये सहभागी व्हावे अन्यथा परवाने रद्द करू अशा नोटिसा बजाविल्या होत्या. जिल्ह्यातील सर्वच बाजार समिती सभापतींनी एकत्रित येताना शासनाने पाच जुलैच्या अध्यादेशातील राहून गेलेल्या त्रृटींवर पुर्णविचार करण्याबाबतचे निवेदन पणन मंत्री सुभाष देशमुख यांना पाठविले होते . या निर्णय प्रक्रि येपासून नांदगाव बाजार समितीने दूर राहणे पसंत केले होते . या निवेदनावर नांदगावचे सभापती तेज कवडे यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता कालच जिल्ह्यातील बाजार समितीशी निगडीत बहुतांशी व्यापारी वर्गाने आपले लायसन्स जमा करण्यास सुरुवात करून दबाव तंत्र नीती अधिक गतिमान केली असल्याच्या पाशर््वभूमीवर नांदगावच्या बाजार समिती मधील कार्यरत अ वर्ग दर्जाच्या खरेदीदार व्यापाऱ्यांनी आज आपले परवाने जमा केले.
व्यापारी असोशियांचे अध्यक्ष मनोहरमल पारख, सचिव सुमेर कासलीवाल, उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष रामनिवास कलंत्री ,नगरसेवक रमेश करवा व सल्लागार संदीप फोपलीया सोमनाथ घोंगाणे,आदींनी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्याकडे निवेदन जमा केले. दरम्यान गेल्या आठवड्यापासून बाजार समितीत कामकाज खोळबल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे .
आज व्यापाऱ्यांनी लायसन्स परत केले असले तरी बाजार समितीने मात्र शेतकरी व शासनाच्या विरोधात जायचे नाही अशी स्पष्ट भूमिका घेताना जिल्ह्यातील बाजार समितीपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे देखील स्पष्ट झाले.
कळवण : नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्याचे व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र समोर असतानाच कांदा व धान्य खरेदी करणाऱ्या कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील ७० व्यापाऱ्यांनी सामूहिकपणे व्यापारी परवाने कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार , सचिव रवींद्र हिरे यांच्याकडे परत करु न शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवार खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या सोमवारपासून कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांसह अभोणा, कनाशी येथील व्यापारी बांधवांनी शासनाच्या नियंत्रणमुक्त निर्णयामुळे शेतमालांच्या लिलावावर बहिष्कार टाकल्याने तीन कोटी रु पयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे बाजार समितीचे लाखो रु पयांचे उत्पन्न बुडाले आहे.
जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याची नोटीस बजावली होती. कळवण येथील ७० व्यापाऱ्यांनी परवाने रद्द करण्याची वाट न पाहता कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांच्याकडे परवाने परत केले .
यावेळी विजय बधान, जयवंत पगार, नितीन अमृतकार, प्रशांत सोनजे , सचीन पगार , योगेश शिंदे, उदय नावरकर , नंदू वाघ , विजय शिरसाठ यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.
येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत ९ जुलै पासून कांदा, भुसार व भाजीपाला मार्केट बंद ठेवले होते. या पाशर््वभूमीवर तब्बल ७ दिवसांनी पुन्हा एकदा तीव्र निषेध करत येवल्यातील ५५ कांदा, भुसार व भाजीपाला व्यापाऱ्यांनी आपले परवाने बाजार समितीला परत करून शनिवारी अखेरचे दबावतंत्र वापरण्यास सुरु वात केली आहे.
येवला बाजार समितीच्या आवारात शनिवारी सकाळी ११ वाजता ५५ कांदा, भुसार व भाजीपाला व्यापारी असोशिएशन हॉल वर एकित्रत आले. दरम्यान बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, जेष्ठ नेते माणिकराव शिंदे, बाजार समिती सचिव डी.सी.खैरनार यांच्याशी शासनाची या संबधाने असलेली भूमिका आणि व्यापाऱ्याची बाजू याबाबत चर्चा झाली. व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी आपले परवाने बाजार समितीकडे परत केले. द्राक्ष, मका, डाळिंब, या पिकाचे खाजगी नियमन मुक्त व्यापारात पैसे बुडून शेतकरी फसल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. यावेळी प्रदीप गुजराथी, उमेश आट्टल, योगेश सोनी, राजेश संघवी, सुभाष समदडीया, रामेश्वर कलंत्री, प्रणव समदडीया, सुरेंद्र वडे,गीतेश गुजराथी, हुसेन शेख, पप्पू ठाकूर, साहेबराव ढोले, भिकाजी माळी, विलास गाढे, नितीन देशमुख, सुरेश आट्टल, बाळनाथ धुमाळ, निवृत्ती ढोले, श्रीकिसन दायमा, भाजीपाला व्यापारी दत्ता निकम, कैलास पवार, दत्ता पुणेकर, राजू लिंबूवाले, जावेद शेख, भुसार मालाचे व्यापारी मनोज कासलीवाल, शरद श्रीश्रीमाळ, किशोर ठाकूर आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: Return licenses to traders from the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.