नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाचा पिकांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:09 PM2020-10-19T23:09:38+5:302020-10-20T01:48:52+5:30
नाशिक : बागलाण तालुक्यातील नवी शेमळी व जुनी शेमळी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात शेतिपकांसह जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने पाण्याच्या लोंढ्यात कांदा, मका, कणीस, कडबा चार्यासह शेळ्या, वासरू, रिक्षा, पत्र्याचे शेड वाहून गेले. गावाजवळील धरण ओव्हर फ्लो झाल्याने त्यातील मासे वाहून गेले.

नवी शेमळी येथील शेतकरी परशराम वाघ यांच्या पंधरा ते सोळा शेळ्या, दहा ते बारा शेळीची पिल्लू, गाय, एक वासरू यासह कांदाचाळीच्या जाळ्या, सतरा ट्रॉली मका, पाच ते सहा ट्रॉली कांदा, ?पेरिक्षा पुरात वाहून गेली. गुरांसाठी साठवून ठेवलेला मक्?याचा चाराही वाहून गेला. कोटींचे नुकसान झाल्याने वाघ यांना अश्रू अनावर झाले होते. सकाळी तलाठी चव्हाण, ग्राममसेवक साळुंखे व नवी शेमळीचे पोलीसपाटील, तेजस वाघ यांनी गावातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. आमदार दिलीप बोरसे यांनी या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. जुनी शेमळी येथील शेतकरी दादा अिहरे यांचे ?? गुंठे लागवड झालेल्या कांदा रोपांसह मका पिकाचे नुकसान झाले तसेच ??फूट विहीर गाळाने बुजली गेली. ?? हजार रु पयांचे गांवाजवळील धरणात टाकलेले मासे धरण भरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. काही दिवसांपूवर्प विडलांचे छत्र हरपलेल्या अिहरे यांनी शेतीची उभारणी केली होती, मात्र परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.
नुकसान भरपाईची प्रतीक्षा
इगतपुरी तालुक्क्यात तासाभरातच शेतकर्यांच्या मुखातला घास हिरावला गेला आहे. मुख्य पीक असलेल्या भातशेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. पंचनामे व नुकसानभरपाईची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे. झालेल्या नुकसानीची शासनाने आतातरी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करावेत, स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाहणी करून दिलासा द्यावा, अशी मागणी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी करीत आहेत.