पुनर्भेट :आईपासून दुरावलेला बछडा पुन्हा विसावला कुशीत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:13 PM2020-12-02T16:13:07+5:302020-12-02T16:17:00+5:30
नाशिकच्या इको-इको वन्यजीवप्रेमी संस्थेची मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात बिबट मादी आणि बछड्याची पुनर्भेटीचा प्रयोग सुरु केला गेला.
नाशिक : निफाड तालुक्यातील वडाळीनजीक गावात असलेल्या एका शेतात बेवारसपणे आढळून आलेल्या तीन महिन्यांचा बछडा मातेपासून दुरावला होता. शेतकऱ्यांनी वनविभागाला माहितील दिल्यानंतर येवला वनपरिक्षेत्राचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतले. मंगळवारी (दि.१) संध्याकाळी या बछड्याची त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा प्रयोग करण्यात आला असता मादी पुन्हा येत त्या बछड्यालासोबत घेऊन गेली.
त्यानंतर नाशिकच्या इको-इको वन्यजीवप्रेमी संस्थेची मदतीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल्टे यांच्या मळ्यात बिबट मादी आणि बछड्याची पुनर्भेटीचा प्रयोग सुरु केला गेला. एका स्टीलच्या जाळीखाली बछड्याला सुरक्षितरित्या झाकून ठेवण्यात आले आणि संपुर्ण परिसर निर्मनुष्य केला. जाळीला लांब दोरी बांधून ठेवण्यात आली. यावेळी ट्रॅप कॅमेऱ्यांसह वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी ३६०अंशात फिरणारा डिजीटल कॅमेरा त्यादिशेने बसविला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतातून बाहेर येत मादीने दर्शन दिले. यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. वडाळीनजीक गावात बिबट्याचा बछड्यांसह वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने येथील सर्व नागरिकांना व शेतमजुरांना सतर्क राहत खबरदारीच्या सुचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.
-
...अन मातेचे ममत्व झळकले
मादीने कॅरेटजवळ जाऊन हुंगण्यास सुरुवात केल्यानंतर लांब अंतरावर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी जाळीला बांधलेली दोरी अलगद ओढत जाळी उंचविली. यावेळी बछड्याने बाहेर येऊन मातेला चाटण्याचा प्रयत्न केला; मात्र मादी पुन्हा तेथून शेतात निघून गेली आणि काही मिनिटांत माघारी फिरली आणि पुन्हा जाळीजवळ आली असता जाळी तत्काळ ओढण्यात आल्याने बछडा वेगाने बाहेर पडला. यावेळी मातेने त्याच्या तोंडाला चाटत त्याला जबड्यात धरत पुन्हा शेत गाठले.