कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या भरपाईसाठी महसूलमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:20 PM2020-03-20T17:20:09+5:302020-03-20T17:20:57+5:30
लासलगाव : सोशल मिडियावरील अफवांमुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करून कुक्कुटपालन व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चिकन खाल्ल्याने कोरोना होत असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने गांभीर्याने विचार करून तत्काळ कुक्कुटपालन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत तसेच कुक्कुटपालनासाठी घेतलेले कर्ज, व्याज माफ करून रोख स्वरूपात शेतकºयांना मदत करायला पाहिजे. सद्यपरिस्थितीमध्ये प्रति किलोसाठी ७५ ते ८० रु पये खर्च येत आहे मात्र दहा रु पये किलोने विक्र ी करणे देखील कठीण झाले आहे. अनेकांना ग्राहक न मिळाल्याने जिवंत कोंबड्या पुरु न टाकाव्या लागत आहेत. त्यामुळे अशी भयानक अवस्था निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यासंदर्भात डॉ. सचिन होळकर यांच्यासह पोल्ट्रीचालक शेतकºयांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व इंद्रजीत थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी राजेंद्र होळकर, जितेश साबळे, विष्णू पंडित, जितेंद्र ताजणे, सोमनाथ सातपुते,राजू भोर, सुनील कोटकर, किशोर शिरसाठ, राजेंद्र घुगे, भाऊसाहेब साबळे आदी कुक्कुटपालक शेतकरी उपस्थित होते.