महसूल मंत्रालयात बदल्यांचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:14 AM2019-02-28T01:14:48+5:302019-02-28T01:15:07+5:30

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत.

 Revenue Ministry stalled the exchange of money | महसूल मंत्रालयात बदल्यांचा घोळ सुरूच

महसूल मंत्रालयात बदल्यांचा घोळ सुरूच

googlenewsNext

नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला असून, एकेका अधिकाऱ्याच्या दोन ते तीन वेळा बदल्या करण्यात आल्याने महसूल अधिकारी सैरभैर झाले आहेत. आयोगाच्या नियम व निकषातच जर बदल्या केल्या गेल्या असतील तर अशा बदल्या कोणत्या निकषाच्या आधारे पुन्हा पुन्हा बदलू लागल्या आहेत, असा सवालही केला जात आहे.
स्वजिल्हा, एकाच जिल्ह्णात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले, निवडणुकीची कामे केलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या २० फेब्रुवारीपर्यंत करून त्याचा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्याचे आदेश असल्याने महसूल मंत्रालयाने गेल्या बुधवारी राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या केल्या. या बदल्यांसाठी लावण्यात आलेले निकष पाहता, अपवाद वगळता एखाद-दुसरा अधिकारी बदलीच्या कचाट्यातून सुटला असेल.
अनेक अधिकाºयांचा मंत्रालयात तळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून मंत्रालयात काही अधिकाºयांनी तळ ठोकला असून, सोयीची बदली करण्यासाठी ‘काहीही’ करण्याची तयारी अधिकारी दर्शवित असल्याने त्याला मंत्रालयातील संबंधित अधिकाºयांकडून तसा प्रतिसादही मिळत असल्यानेच दरदिवशी बदल्यांच्या आदेशात बदल होत असल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जात आहे.
महसूल खात्याने २५ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागातील दहा तहसीलदारांच्या पुनर्बदल्या केल्या तर त्याचदिवशी आणखी दोन उपजिल्हाधिकाºयांच्या बदल्यांमध्ये फेरबदल केला आहे. नाशिक विभागाप्रमाणे अन्य विभागातही बदल्यांचा मचका सुरूच असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.
महसूल विभागाने या बदल्या करताना अत्यंत काटेकोरपणे व त्या त्या विभागीय आयुुक्तांकडून दोन ते चार वेळा खात्री करून त्यावर शिक्कामोर्तब केले. परिणामी या बदल्यांमुळे गैरसोय झाली अथवा नियम, निकष डावलून बदली झाल्यामुळे कोणी अधिकारी ‘मॅट’मध्ये गेल्याचेही ऐकिवात नाही. इतक्या ‘पारदर्शी’ परंतु ‘अनेकविध चर्चेत’ अधिकाºयांच्या बदल्या झालेल्या असताना त्यात मात्र महसूल मंत्रालयाकडून दररोज नवनवीन बदल होऊ लागले आहेत. बदली होऊन नियुक्तीच्या ठिकाणी अधिकारी हजर होत नाही तोच त्याची अन्यत्र बदली करण्यात येत असल्याचे पत्र हाती पडत आहे. अशा बदल्या करताना महसूल मंत्रालयाकडून ज्या काही क्लृप्त्या लढविल्या जात आहे, ते पाहता अधिकाºयांकडून संशय घेतला जात आहे.

Web Title:  Revenue Ministry stalled the exchange of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.