क्षेत्र विकासात साडेबारा कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:06 AM2018-06-14T01:06:20+5:302018-06-14T01:06:20+5:30

नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर ३९० बांधकामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामधून १२ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती महानगर नियोजनकार प्रतिभा भदाणे यांनी दिली.

Revenue Revenue of Rs | क्षेत्र विकासात साडेबारा कोटींचा महसूल जमा

क्षेत्र विकासात साडेबारा कोटींचा महसूल जमा

Next

नाशिकरोड : नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर ३९० बांधकामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामधून १२ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती महानगर नियोजनकार प्रतिभा भदाणे यांनी दिली.विभागीय आयुक्त कार्यालयात गेल्या मार्च २०१७ मध्ये राज्य शासनाकडून नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. प्राधिकरणाकडे स्थापनेपासून गेल्या सहा महिन्यांत बांधकाम मंजुरीसाठी ४३९ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ३९० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, ४९ प्रस्ताव पेंडिंग आहेत. यामधून प्राधिकरणाकडे १२ कोटी ५७ लाखांचा महसूल जमा झाला असून, त्यातील ४ कोटी ४४ लाख रुपये राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाकडे जमा करण्यात येणार आहे.  प्राधिकरणामध्ये स्थापनेपासून अवघे चार अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहे. प्राधिकरणाला राज्य शासनाने निधी व कर्मचारी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Web Title: Revenue Revenue of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.