कृषी योजनांचा सभापतींकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:43 PM2020-02-25T23:43:49+5:302020-02-26T00:11:07+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक सभापती संजय बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात प्रामुख्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली.
पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक सभापती संजय बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात प्रामुख्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर योजनांसाठी प्राप्त झालेला निधी माहे मार्च २०२० अखेरपर्यंत १०० टक्के खर्च करण्याबाबत नियोजन करून तशी कार्यवाही करण्याबाबत सभापतींनी सूचना दिल्या आहेत. तर कृषी समितीच्या सभेतही सभापती बनकर यांनी जिल्हा परिषद सेस निधीअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदानाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या इतर विविध विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेण्यात आली. कृषी समितीच्या यापुढील बैठकांना सर्व कृषी विस्तार अधिकारी आणि अधिकारी यांनी उपस्थित राहून आढावा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.