सिन्नर महाविद्यालयात उजळणी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:55 PM2020-12-22T22:55:23+5:302020-12-23T00:52:09+5:30
सिन्नर : येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी उजळणी वर्गाच्या सहाव्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ उपस्थित होते.

त्यांनी मनोगतात व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व उदाहरणासह स्पष्ट केले. व्यक्तिमत्त्व विकास हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे काय, हे स्पष्ट करताना समाजात वावरताना सौंदर्याला व्यक्तिमत्त्व समजले जाते. सामाजिक प्रभाव पाडणारे शारीरिक सौंदर्य महत्त्वाचे नसून माणसाचे असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्त्व असते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्वाबाबत अनेक समज, गैरसमज या विषयावरती त्यांनी प्रकाश टाकला.
दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे आहे, असे परखड मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती. व्ही. एल. देशमुख यांनी मनोगतात व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, कार्यक्रम समन्वयक प्रा. सी. जे. बर्वे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर टी. गुरुळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. जी. एन. शेळके यांनी, तर सूत्रसंचालन एस. पी. मोरे यांनी केले. के. एस. सोनवणे यांनी आभार मानले.