सिन्नरच्या दांडेकर महाविद्यालयात उजळणी वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:12 PM2020-12-25T17:12:09+5:302020-12-25T17:12:37+5:30
सिन्नर : जीवन जगत असतांना व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आलेल्या आव्हानांचा सामना करावा. आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणे म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन होय. सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याचे व्यवस्थापन करणे शक्य असल्याचे मत लोणावळा येथील पुरंदरे महाविद्यालयातील डॉ. डी. जे दरेकर यांनी नोंदविले. येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी उजळणी वर्गाच्या आठव्या दिवशी प्रमुख अतिथी ते बोलत होते.
डॉ. दरेकर यांनी आयुष्याचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. वेळेचे व्यवस्थापन, विचारांचे व्यवस्थापन, स्वभावाचे व्यवस्थापन, नात्यांचे व्यवस्थापन त्यांनी विशद केले. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर. टी. गुरुळे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीमती. एस. एस. काळे यांनी व्यवस्थापनाबाबत मत व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. बी. एस. शिंदे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. बाजारे यांनी तर आभार प्रा. व्ही. बी. म्हस्के यांनी मानले. याप्रसंगी समन्वयक प्रा. चंद्रशेखर बर्वे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.