ग्रामीण रु ग्णालयाचा उपसंचालकांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:47 PM2018-09-29T22:47:25+5:302018-09-29T22:49:09+5:30
सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयास आरोग्यसेवेच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. कामात कसूर केल्यास रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी जगदाळे यांनी पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था याबाबत विचारणा केली. सर्व कर्मचाऱ्यांनी निवासी राहावे, वेळेवर हजर राहावे, प्रसूतिगृहात स्वच्छता ठेवावी, आॅक्सिजनची सुविधा करावी, वीज नसेल तेव्हा जनरेटरची सोय करावी, रुग्णालयाची वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ अशी ठेवावी, कर्मचाºयांनी वेळेत काम न केल्यास नागरिकांची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. पांडोले हे एकटेच कायमस्वरूपी रुग्णालय सांभाळतात. भाजपा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी सुरगाणा येथे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. देवळीकर, डॉ. श्याम थविल, डॉ. मधुकर पवार, डॉ. सूर्यकांत चौधरी, डॉ. हेमंत घांगळे, डॉ. विजय साठे, डॉ. लीना ढाके, रामभाऊ थोरात आदींसह कर्मचारी उपस्थित होते.