जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडून पालिकेच्या विकासकामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:12+5:302021-07-12T04:10:12+5:30

जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली सटाणा नगरपालिकेच्या सभागृहात विभाग प्रमुख यांच्या कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात ...

Review of development works of the municipality by the district administration officer | जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडून पालिकेच्या विकासकामांचा आढावा

जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडून पालिकेच्या विकासकामांचा आढावा

Next

जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली सटाणा नगरपालिकेच्या सभागृहात विभाग प्रमुख यांच्या कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान, पुनद पाणीपुरवठा योजना संथ गतीने चालत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सकाळी ८ वाजता उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे दाखल झाले. यावेळी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाची प्रथमता पाहणी केली. त्यानंतर शहरातील विविध वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांची पाहणी केली. त्यात पाठक मैदान परिसरातील नाना नानी पार्क, नव्याने निर्माण होत असलेला रिंग रोड व नव्याने विकसित होत असलेल्या मोकळ्या भूखंडांची पाहणी केली. पुनद पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत शहराच्या वितरण वाहिनीच्या कामकाजाची पहाणी केली. तसेच चौगाव बर्डी येथील दोन जलकुंभांचे बांधकाम, व कचरा डेपो पहाणी करुण त्यांनी सटाणा नगरपालिकेत विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

यावेळी मुंडावरे यांनी, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जल, अग्नी, वायू या घटकांमध्ये नगर परिषदेचे काम उंचविण्याचे निर्देश देत, शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व रेन वॉटर परकुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली व आरोग्यविषयक माहिती घेतली. नगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेच्या कामकाजाचीदेखील त्यांनी पाहणी केली. माझी वसुंधरा या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली व सूचनाही केल्या.

त्यानंतर जिल्हाधिकारी मुंडावरे यांनी थेट पुनद धरणावर जाऊन पुनद पाणीपुरवठा योजने संदर्भातील WTP, जॅकवेल, सर्वच कामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

फोटो - ११ सटाणा मुंडावरे

सटाणा शहरातील विविध विकास कामांची पाहणी करताना जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे. समवेत नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, विविध विभागाचे अभियंता.

110721\11nsk_11_11072021_13.jpg

सटाणा शहरातील विविध विकास कामांची पाहणी करतांना जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन मुंडावरे. समवेत नगराध्यक्ष सुनिल मोरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, विवीध विभागाचे अभियंता. 

Web Title: Review of development works of the municipality by the district administration officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.