पोलीस आयुक्तालयात सिंहस्थ कुंभमेळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा
By admin | Published: May 20, 2014 12:42 AM2014-05-20T00:42:31+5:302014-05-20T00:45:37+5:30
नाशिक : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात सोमवारी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली़ या बैठकीत रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी शहरातील अंतर्गत नियोजन तसेच प्रत्यक्ष जागेची पाहणीही केली़ पुढील वर्षी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यात संपूर्ण देशभरातून भाविक नाशिकमध्ये येणार आहेत़ त्यादृष्टीने रेल्वेची तयारी, एसटीचे नियोजन, बांधकाम विभागाची भूमिका याबाबत चर्चा करून नाशिकरोड रेल्वेस्थानक, दिंडोरीरोड, पेठरोड, पाथर्डी फ ाटा आदि ठिकाणची अधिकार्यांनी पाहणी केली़ या बैठकीला पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांच्यासह रेल्वे, परिवहन महामंडळ व बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)