आरोग्य विभागाचा सभापतींकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:05+5:302021-05-15T04:14:05+5:30
पंचायत समिती आरोग्य विभाग कार्यालयात सदर बैठक झाली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण, ग्रामीण भागातील कुटुंब सर्वेक्षण, बाधित रुग्ण व उपचार ...
पंचायत समिती आरोग्य विभाग कार्यालयात सदर बैठक झाली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण, ग्रामीण भागातील कुटुंब सर्वेक्षण, बाधित रुग्ण व उपचार आदींबाबत गायकवाड यांनी आढावा घेऊन ग्रामीण भागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा बंद न ठेवता त्या सुरू करण्याच्या सूचना केल्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती सुविधा सुरू पाहिजे, याबाबत कसूर होता कामा नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकडे यांच्यासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
फोटो - १४ येवला १
येवला पंचायत समिती कार्यालयात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना सभापती प्रवीण गायकवाड. समवेत डॉ. शरद कातकडे व अन्य वैद्यकीय अधिकारी.
===Photopath===
140521\14nsk_23_14052021_13.jpg
===Caption===
येवला पंचायत समिती कार्यालयात आरोग्य विभागाचा आढावा घेतांना सभापती प्रविण गायकवाड. समवेत डॉ. शरद कातकडे व अन्य वैद्यकीय अधिकारी.