चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर प्रशासनाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:36 PM2019-04-01T17:36:39+5:302019-04-01T17:38:12+5:30
सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव येत्या १३ ते २० एप्रिलच्या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ. पंकज अशिया व तहसिलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली.
सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव येत्या १३ ते २० एप्रिलच्या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ. पंकज अशिया व तहसिलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आराखडा आढावा बैठक ट्रस्टच्या कार्यालयात घेण्यात आली.
सर्व विभागांनी यात्रा कालावधीत आपली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले. चोख बंदोबस्तात चैत्रोत्सव पार पाडण्यात येणार आहे. प्लॅस्टीक कॅरीबॅकचा वापर टाळण्यात यावा यासाठी सप्तशृंगगडावरील टोल नाक्यावर भाविकांची तपासणी करण्यात यावी अशी सूचना अशिया यांनी ग्रामपंचायतीला केली.
भगवतीचे दर्शन सूलभ व्हावे यासाठी खास सोयी करण्यात येणार असून मंदीर दर्शनासाठी २४ तास खूले ठेवण्यात येणार आहे. नऊ ते दहा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील असा अदांज प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे. ट्रस्टतर्फे श्री भगवती मंदीर, सभा मडंप, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, मोफत महाप्रसाद व्यवस्था तसेच परीसर बंदोबस्त, साफसफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, करण्यात येणार आहे. दहशतवादी हल्ला व नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास भाविकांसाठी विमा काढण्यात आला आहे. तसेच पूजेचे पत्रिकेचे निमंत्रण भाविकांपर्यत पोहचवण्यासाठी व्हॉटसॅप, फेसबूक व टपालाद्वारे पाठविण्यात आले असल्याची माहिती सप्तशृंगी निवासीनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहांतोडे यांनी दिली.
सूरक्षेच्या दृष्टीने मंदिर व शिवालय तलावाच्या परीसरात एकूण ६५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पहिल्या पायरीजवळ दोन व मंदिरात दोन असे चार मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. दरम्यान प्रदक्षिणा मार्ग बंद करण्यात आला आहे.
यात्रा कालावधीत नादूंरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार असून गडावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर गावातील वाहने व अतिमहत्वाच्या भाविकांकरीता वाहने गडावर नेण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी कत्राटी कामगार याची नेमणूक यात्रा कालावधीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणार आहे. नादूंरी वाहनतळावर तात्पुरती स्वच्छतागृहे, शौचालये, उभारण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत व ट्रस्ट मार्फत पिण्याच्या पाण्याची टॅँकरद्वारे व्यवस्था केली जाणार आहे.
सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव कालावधीसाठी जिल्हा परिषद, नाशिक व पचांयत समिती कळवण, व आरोग्य विभागाच्यावतीने सप्तशृंगगड, नादूंरी येथे येणारे लाखो भाविकांच्या वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, परीचर तज्ञ, डॉक्टरांच्या नेमणूका करण्यात येणार आहे. आयुर्वेद सेवा संघ व अन्य काही संस्थांच्या मदतीने वैद्यकीय सूविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रूग्णासाठी ट्रस्ट व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कायदा व सूव्यवस्था अबांधित ठेवण्यासाठी नांदुरी व सप्तशृंगगड येथे पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महीला पोलीस निरीक्षक, महिला होमगार्ड व नागरिक संरक्षण दल, ग्रामसूरक्षा दल, अग्नीशामक दल आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीवहन नाशिक विभागातून कळवण आगार यात्रा कालावधीत भाविकांना नांदुरी ते सप्तशृंगगड येण्या-जाण्यासाठी ८० एस टी बसेस व ३७५ एस टी बसेस जळगाव, नंदूरबार, धूळे व ईतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. भाविकांची गर्दी वाढल्यास जादा बसेसही उपलब्ध करून देणार असल्याचे संबधिताकडून सांगण्यात आले.
अपघाती वळणाला वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असून भाविकांसाठी सप्तशृंगडावर धोड्या-कोड्याच्या विहीरी जवळ स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात येणार आहे.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिदे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबंळे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सप्तशृंगगडावरील सरंपच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते संदिप बेनके ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
(फोटो ०१ सप्तशृंगी)