सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक
By admin | Published: June 12, 2015 11:33 PM2015-06-12T23:33:13+5:302015-06-12T23:35:54+5:30
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकासकामासंदर्भात आमदार निर्मला गावित यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी प्रभारी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपअभियंता महेश पाटील, एल. बी. बोरोले, पालिका मुख्याधिकारी एम. एन. नागरे तसेच तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक विश्रामगृहावर आमदार गावित यांनी बोलविली होती.
या बैठकीत सार्वजनिक बांधाकाम विभाग, त्र्यंबक नगरपालिका, त्र्यंबक तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, वन विभाग (अधिकारी अनुपस्थित) मात्र अकौंट विभागातील श्रीमती अनुजा हटकर यांनी जुजबी माहिती दिली. यावेळी अंजनेरी गटात बरीच कामे अपूर्ण असून संबंधित अधिकाऱ्याला त्याचा जाब विचारला तर ग्रामपंचायतीअंतर्गत अनेक कामे सुरू असून सर्व कामे अपूर्णावस्थेत आहे. या कामांकडे व्यक्तिगत लक्ष देऊन कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना केल्या.
आरोग्य विभागाबद्दल अनेक तक्रारी असून कळमुस्ते, मेटघर आदि ठिकाणी कर्मचाऱ्यांना क्वार्टर बांधून दिले असले तरी ते मुख्यालयात राहत नाहीत. क्वार्टर्सचा वापर करीत नाही अशा कर्मचाऱ्यांचे वेतन रोखा, त्यांना मुख्यालयी राहात नाही, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मुख्यालयी राहावे, असे बजवावे अन्यथा वेतन थांबवावे, असेही सुनावले. यावेळी त्र्यंबक नगरपालिकेत चाललेल्या कामाविषयी त्यांनी माहिती घेतली. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे यांनी कामांच्या प्रगतीबाबत माहिती दिली. डॉ. लोंढे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत माहिती दिली. कृषी विभागातील खतांचे नियोजन करावयास हवे, खरीप हंगामाचे नियोजन केले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आजच्या आढावा बैठकीस पोलीस उपनिरीक्षक बेंडाळे, जिल्हा परिषद उपअभियंता व्हनमाने, कृ. अ. अजय सूर्यवंशी, पी. डी. जाधव, आर. एच. डोंगरे, भूमिअभिलेखचे बी. एच. खरे, दुय्यम निबंधक आर. बी. भालेराव, सहायक गटविकास अधिकारी संजय केदारे, बालविकास अधिकारी मोहन तुपे, पी. आर. महाजन (आरोग्य), व्ही. व्ही. इंगळे (इ.द.) शाखा अभियंता, उपकोषागारचे किशोर पाटील, आर. एच. डोंगरे (शा.अ.) आदि उपस्थित होते.