मालेगावी गणेशोत्सवासंदर्भात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:32 AM2021-09-02T04:32:25+5:302021-09-02T04:32:25+5:30
बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विद्युत विभागाने शहरातील पथदीप व्यवस्था सुरळीत ठेवणे, मिरवणूक मार्गावरील तसेच शहरातील सर्व बंद पडलेले ...
बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. विद्युत विभागाने शहरातील पथदीप व्यवस्था सुरळीत ठेवणे, मिरवणूक मार्गावरील तसेच शहरातील सर्व बंद पडलेले पथदीप सुरू करणे, महादेव घाट, गणेश कुंड, कॅम्प गणेश कुंड, कृत्रिम कुंड या ठिकाणी पथदीप व्यवस्था करणे. जिथे लाइट नसेल तिथे तात्काळ विद्युत रोषणाई करणात यावी. स्वच्छता विभागाने गणेशोत्सव कालावधीत नियमितपणे साफसफाई करून शहरातील स्वच्छता अबाधित राखावी, जंतुनाशक फवारणी करणे, तसेच जिथे मोठे मंडळ असतील तेथे व शहरात वेळेत कचरा उचलायचे काम पूर्ण करावे, संबंधित मक्तेदार यांना वेळेत पत्र देऊन स्वच्छतेबाबत नियोजन करणे, पाणीपारवठा विभागाने सण-उत्सव काळात पाणीपुरवठा सुस्थितीत सुरू ठेवावा. आरोग्य विभागाने मुबलक औषध साठा व रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांसह सुसज्ज ठेवावी. अग्निशमन विभागाने आपत्कालीन परिस्थितीत, तसेच गणेशोत्सव कालावधीत आपले वाहन कर्मचाऱ्यांसह तत्पर ठेवावे. आस्थापना विभागाने गणेश कुंडावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश निर्गमित करावे आदी सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
बैठकीस माजी महापौर शेख रशीद, उपमहापौर नीलेश आहेर, नगरसेवक सखाराम घोडके, लेखा अधिकारी राजू खैरनार, सहायक आयुक्त वैभव लोंढे, तुषार आहेर, अनिल पारखे, आरोग्याधिकारी, डॉ. सपना ठाकरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, नगररचनाकार संजय जाधव, नगरसचिव श्याम बुरकुल, अग्निशमन अधीक्षक संजय पवार, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख, प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, श्याम बुरकुल, हरीश डिगंबर उपअभियंता जयपाल त्रिभवन, सचिन माळवाल, अभिजित पवार, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.