इगतपुरी नगरपरिषदेत विविध प्रलंबीत विकास कामांबाबत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 06:35 PM2020-12-26T18:35:29+5:302020-12-26T18:36:15+5:30
इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त विकास कामे झाली पाहिजे, कामे त्वरित व्हावी आणि इगतपुरी शहराचा विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू या अश्या सूचना आमदार हिरामण खोसकर यांनी केल्या.
इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त विकास कामे झाली पाहिजे, कामे त्वरित व्हावी आणि इगतपुरी शहराचा विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू या अश्या सूचना आमदार हिरामण खोसकर यांनी केल्या.
यावेळी १९ नगरसेवकांपैकी केवळ पाच नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरविकास विभागाकडे मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेचा विकास निधी थकीत असेल तर नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे या बाबत मागणी करण्याचे ठरविण्यात आले.
शहरात विकासाअभावी लोकसंख्या कमी होण्याचे प्रमाण वाढत असुन दुसरीकडे पर्यटनाचा ओघ वाढत आहे. यात शासनाचा विविध विकास कामांचा निधी केवळ केलेल्या जुन्या कामांच्या डागडूजीत खर्च करून शहराचा विकास कसा साधणार यावरही चर्चा करण्यात आली.
दरम्यान या बैठकीत एकुण २८ विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.. यावेळी नगरसेवक सुनिल रोकडे, संपत डावखर, किशोर बगाड, युवराज भोंडवे, विनोद कुलथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सैयद, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष सोनवणे, माजी नगरसेवक मिलिंद हिरे, नियाज खलीफा तसेच नगरपरिषदेचे सर्व विभागीय प्रमुख उपस्थित होते.
प्रतिक्रीया ...
अल्पसंख्याक घटकांच्या विकासाची अनेक कामे करण्याचा ठराव व प्रस्ताव शासनाकडे दिला असुन निधीही आहे. मात्र जिल्हा प्रशासन प्रस्ताव मंजुर करत नसुन निधीही नगरपरिषदेकडे पाठवीत नसल्याने बहुतांशी कामे रेंगाळली आहेत. ही कामे पुर्ण होण्यास सहकार्य करावे.
- नईम खान, उपनगराध्यक्ष, इगतपुरी.
शासनाकडुन येणारा विकास निधी अपुरा असुन उर्वरीत व थकीत निधी मिळाल्यास शहरातील प्रलंबीत कामे पुर्णत्वाला जाणे सोपे होईल. या करीता शासनाकडील थकीत निधी बाबत आमदार खोसकर यांनी नगरपरिषदेला वेळोवेळी सहकार्य करावे.
- निर्मला गायकवाड-पेखळे, मुख्याधिकारी, इगतपुरी.